26 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरमहाराष्ट्रशिंदे गटातील विजय चौगुलेंनी गणेश नाईकांवर केले आरोप

शिंदे गटातील विजय चौगुलेंनी गणेश नाईकांवर केले आरोप

टीम लय भारी

नवी मुंबई : नवी मुंबईतील तीन माजी नगरसेवकांनी मंगळवारी (दि. १९ जुलै २०२२) भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता शिंदे गटातील नवी मुंबईचे प्रमुख विजय चौगुलेंनी गणेश नाईक यांच्यावर आरोप (Vijay Chaugule allegations against Ganesh Naik) केले आहेत. तसेच गणेश नाईक यांनी केलेले हे कृत्य त्यांच्यावर नक्कीच भारी पडणार असल्याचा इशारा देखील यावेळी विजय चौगुले (Vijay Chaugule) यांनी दिला आहे.

राज्यात नुकतेच भाजप-शिंदे सरकार स्थापन झाले आहे. आणि असे असताना शिंदे गटाचे नगरसेवक पळवून गणेश नाईक यांनी आपली राजकीय अपरिपक्वता दाखवून दिल्याचा आरोप विजय चौगुले यांनी केला आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांचा गट एकत्र येत असतानाच गणेश नाईक यांच्याकडून करण्यात येत असलेले फोडाफोडीचे राजकारण योग्य नसल्याचे मत विजय चौगुले यांनी व्यक्त केले आहे.

एका वर्षापूर्वीच भाजपमध्ये असलेल्या नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते यांनी त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. पण आता या तिन्ही माजी नगरसेवकांनी पुन्हा एकदा घर वापसी करत गणेश नाईक यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. म्हणून नवी मुंबईत शिंदे गटाला सुद्धा जोरदार झटका मिळाला आहे.

दरम्यान, यामुळे आता नवी मुंबईमध्ये गणेश नाईक विरुद्ध विजय चौगुले असा राजकीय वाद रंगण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या गळाला शिंदे गटातील हे नगरसेवक लागल्याने विजय चौगुलेंनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते हे नवी मुंबईतील प्रभावी नगरसेवक आहेत. त्यामुळे या तिघांच्या भाजप वापसीने याचा फायदा नवी मुंबईतील निवडणुकीत भाजपला होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा :

शिवसेनेतील बंडखोरांनी ‘पक्षघटनेला‘च फासला हरताळ

जनरल नाॅलेज: राष्ट्रपतींना ‘शपथ‘ कोण देतो?

संजय मंडलिकांनी कोल्हापुरातील शिवसैनिकांची फसवणूक केली : संजय पवार

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!