27 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रViral Audio Clip : किमान तीनशे रुपये तरी द्या, मंत्री भूमरेंच्या सभेआधीच...

Viral Audio Clip : किमान तीनशे रुपये तरी द्या, मंत्री भूमरेंच्या सभेआधीच ऑडिओ क्लीप जोरात

सदर क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेसाठी विषय मिळाला आहे. याआधी सुद्धा सभा घेताना पैसे देऊन मोठा जनसागर बोलावला जातो अशा वावड्या उठत होत्या आणि या क्लिपमुळे हा संभ्रम आणखीच वाढला त्यामुळे सदर व्हायरल झालेली क्लीप खरी की खोटी हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. 

राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. राजकीय वर्तुळातील वातावरण ढवळून निघत असले तरीही शिंदे गटातील मंत्री कोणत्या ना कोणत्या कारणाने सध्या टीकेचा विषय बनत आहेत तरीसुद्धा आपलाच घोडा दामटत या मंत्र्याकडून आपली बाजू कशी खरी हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच प्रत्यय एकनाथ शिंदे यांच्या सभेच्या निमित्ताने अनुभवायला मिळाला. औरंगाबाद येथील पैठण शहरात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी पैसे वाटल्याचा आरोप करणाऱ्या दोन कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेआधीच वादावादीचे राजकारण सुरू झाले आहे.

सध्या सोशल मीडियावर दोन कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. यामध्ये पैठण येथे संदिपान भुमरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या सभेचे आयोजन केल आहे. दरम्यान या सभेला लोकांची गर्दी जमा करण्याबाबतचा हा संबंधित ऑडिओ असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये दोन व्यक्ती एकमेकांशी या संदर्भात बोलत असताना अडीचशे रुपये घेऊन सभेसाठी यायला महिला नाही म्हणतात, किमान तीनशे रुपये द्या अशा पद्धतीचा संवाद ऐकायला मिळत आहे. पैठणला येणार म्हणजे पूर्ण दिवस जाणार 200 ते 300 महिला शहरातून पैठणकडे नेण्यात येतील, किमान 300 रुपये तरी द्यावे, कारण पूर्ण दिवस जातो असे थेट संभाषणातून स्पष्ट होत असल्याने विरोधकांना शिंदे गटाला धारेवर धरण्यासाठी आयते कोलीत मिळाले आहे.

हे सुद्धा वाचा…

Asia Cup 2022 : आशिया चषकात पुन्हा श्रीलंकेची बाजी, पाकिस्तानची पुरती जिरली

Officer : प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे खूप मोठी ताकद असते – डॉ. सचिन मोटे

Queen Elizabeth : राजवाडयात जन्म घेऊनही राणी एलिझाबेथच्या पतवंडाना राजकीय वारसा मिळालेला नाही

संभाषण पुढे तसेच सुरू राहते, त्यावेळी एकाकडून असे म्हणण्यात येत आहे की, संदिपान भुमरे साहेब आता मोठे मंत्री झाले आहेत, किमान 300 रुपये तरी द्या, अशी मागणी महिलांकडून होत असल्याचे बोलणे येथे सुरू आहे. संदिपान भुमरे यांचा मुलगा स्वतः पैसे देणार आहे, चिंता करू नका असे सुद्धा या कथित ऑडिओ क्लीपमध्ये सांगण्यात आले आहे. सदर क्लिप ही खरी की खोटी असल्याची पुष्टी अद्याप कुठल्याच मीडियाकडून करण्यात आलेली नाही, त्यामुळे प्रचंड व्हायरल झालेली ही क्लीप खरी आहे का हे सांगणे कठीण आहे.

दरम्यान, सदर क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेसाठी विषय मिळाला आहे. याआधी सुद्धा सभा घेताना पैसे देऊन मोठा जनसागर बोलावला जातो अशा वावड्या उठत होत्या आणि या क्लिपमुळे हा संभ्रम आणखीच वाढला त्यामुळे सदर व्हायरल झालेली क्लीप खरी की खोटी हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी