28 C
Mumbai
Friday, March 22, 2024
Homeमंत्रालयजिल्हा परिषदांमध्ये रिक्त पदांच्या 'थेट भरती'ची प्रतीक्षा कायम

जिल्हा परिषदांमध्ये रिक्त पदांच्या ‘थेट भरती’ची प्रतीक्षा कायम

प्रत्येकवेळी फक्त जीआर आणि पत्रव्यवहारांचा भडीमार करण्यात आला आहे. परिणामी विद्यार्थी आणि नोकरदारवर्गांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाल्याने ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना तातडीने कारवाई करण्याचे पत्र लिहिले आहे.

राज्यातील जिल्हा परिषदांमधील (Zilla Parishad) गट ‘क’ संवर्गातील रिक्त जागांपैकी ८० टक्के जागा भरण्यासाठी भरतीचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे. गेल्या ३ ते ४ वर्षांपासून ग्रामविकास विभागातील जिल्हा परिषदांमधील थेट पदभरती रखडल्याने भरती (recruitment) इच्छूक उमेदवारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. हा असंतोष लक्षात घेता २०१९ पासून रखडलेली जिल्हा परिषदांमधील पदभरती प्रत्यक्षात सुरु करण्याकरता तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती करणारे पत्र ग्रामविकास विभागाने राज्यातील (mantralay) सर्व जिल्हा परिषदांना लिहले आहे. (waiting recruitment on vacant posts in zilla parishad)

ग्रामविकास विभागाचे उपसचिव विजय चांदेकर यांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हे पत्र लिहले आहे. या विषयाचे गांभीर्य आणि २०१९ पासून जिल्हा परिषदांमधील पदभरती रखडल्याने विद्यार्थ्यांमध्ये असलेला असंतोष लक्षात घेता जाहीर पदभरती करण्याकरताा तात्काळ कार्यवाही करावी, ही विनंती. असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

राज्य सरकारच्या पातळीवर याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र यापूर्वीही जिल्हा परिषदेतील रखडलेल्या भरतीबाबत ग्रामविकास विभागाने अनेक पत्र लिहीली, अनेक जीआर काढले. तब्बल २०१७ पासून जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांच्या भरतीबाबत राज्य सरकारने अनेक जीआर काढले आहेत, अनेक पत्रे लिहली आहेत. मात्र प्रत्यक्ष पदभरती कधी होणार याची प्रतिक्षा राज्यातील बेरोजगार युवकांना असून भरतीची वाट बघत त्यांच्यातील नैराश्य आणि असंतोष वाढत आहे.

दरम्यान जिल्हा परिषदेने काढलेल्या वेळापत्रकानुसार नाशिक जिल्हा परिषदेत गट ‘क’ संवर्गातील दोन हजार ५३८ रिक्त जागांच्या ८० टक्के म्हणजे दोन हजार ३० जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १ ते ७ फेब्रुवारीदरम्यान भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार असून, यासाठी निवड मंडळाच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा :

दांडीबहाद्दर ग्रामसेवकांना एकनाथ शिंदेंचा झटका! ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांची हजेरी होणार बायोमेट्रिक प्रणालीद्वारे

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पारधी समाजातील उपोषणकर्त्या वृद्धाचा थंडीने कडकडून मृत्यू; गेंड्याच्या कातडीच्या बेपर्वा प्रशासनाने बळी घेतल्याचा कुटुंबाचा आरोप

प्रेरणादायी : सालगड्याचा पोरगा झाला उपजिल्हाधिकारी!

फेब्रुवारीमध्ये सुरू होणार प्रक्रिया
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्य सरकार अंदाजे हजार सरळसेवा कोट्यातील जागा भरणार आहे. त्यात राज्यातील जिल्हा परिषदांमधील सहा हजारांवर जागांची भरती करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेने रिक्त जागांचा अंतिम आराखडा राज्य शासनाकडे पाठविला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेत सर्व विभागांच्या गट ‘क’ व गट ड या संख्यांच्या दोन हजार ७२६ जागा रिक्त आहेत. यामध्ये दोन हजार ५३८ जागा या गट क मधील आहेत, तर १०८ जागा गट ड मधील आहेत. ग्रामविकास विभागाने राज्यातील राष्ट ‘क’ संवर्गातील रिक्त जागांच्या ८० टक्के जागा भरण्यासाठी जिल्हा परिषदांना मुभा दिली आहे. नाशिक जिल्हा परिषदेत एकूण दोन हजार ७२६ जागा रिक्त असून, त्यात गट मधील १८८ जागा रिक्त आहेत. मात्र, ग्रामविकास विभागाने गट ‘ड’ची रिक्त पदे भरण्यास परवानगी दिलेली नाही. केवळ गट क संवर्गातील पदांची भरती करायची असल्यामुळे दोन हजार ५३८ रिक्त जागांच्या ८० टक्के जागांची भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. गेल्या ३ ते ४ वर्षापासून ही भरती प्रक्रिया रखडली होती. यात भरतीसाठी अर्ज मागवीत, ही प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. त्यामुळे बेरोजगारांमध्ये मोठी नाराजी पसरली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी