जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Water is brought only for politics). आपण माण – खटावचा विकास केलेला आहे. त्यामुळं विरोधकांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलावं, असं जयकुमार गोरे सतत बोलत असतात. त्या अनुषंगाने लय भारीचे संपादक तुषार खरात वेगवेगळ्या गावांमध्ये फिरत आहेत. तेथील जनतेसोबत संवाद साधत आहेत. जयकुमार गोरे यांनी खरंच विकास केला आहे, का याबाबत सामान्य लोकांशी संवाद साधत आहे. वडूज येथील बाजारात जावून तुषार खरात यांनी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कानिफनाथ फडतरे यांची भेट झाली.
आमदार जयकुमार गोरे हे जलनायक नाहीत, तर खलनायक आहेत, अशी संभावना फडतरे यांनी केली. दरम्यान, भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी माण – खटाव मतदारसंघात गुंड पोसले आहेत. विरोधक, पत्रकार, साहित्यिक, अधिकारी वर्ग, सरकारी यंत्रणा यांना धाकात ठेवण्यासाठी जयकुमार गोरे हे सतत आपल्या गुंडांना उत्तेजन देत असतात. गेल्या आठवडाभरापासून आमदार जयकुमार गोरे यांच्या घोटाळ्यांची, दादागिरीची चिरफाड करणारी बातमीदारी ‘लय भारी’ने आक्रमकपणे केलेली आहे. यात जयकुमार गोरे यांनी माण व खटाव तालुक्यांत कशा पद्धतीने गुंडगिरी जोपासली आहे, याचे वारंवार तपशिल दिलेले आहेत. जयकुमार गोरे यांनी जोपासलेल्या गुंडगिरीचा ‘लय भारी’ला प्रत्यय आला.
Jaykumar Gore | देवेंद्र फडणवीसांनी माण – खटावसाठी भरपूर केले, तरीही ते जनतेसाठी खलनायक |