30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रAaditya Thakrey: आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांच्या भेटीवर काय म्हणतात मुंबईकर?

Aaditya Thakrey: आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांच्या भेटीवर काय म्हणतात मुंबईकर?

युवासेनाप्रमुख आणि वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे हे बिहार दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यात भेट झाली आहे

युवासेनाप्रमुख आणि वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे हे बिहार दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यात भेट झाली आहे. या दोन्ही राजकीय वारसा असलेल्या आणि नव्या पिढीच्या नेत्यांमध्ये बऱ्याच वेळ चर्चा झाली. दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. त्यातच आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांच्या भेटींमुळे देशाच्या राजकारणावर चांगला परिणाम होईल. या पार्श्वभूमीवर आम्ही मुंबईकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, त्या दरम्यान लोकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या.
४० वर्षे शिवसेनेची सत्ता होती आणि कायम राहणार. त्यातच हे दोन नेते एकत्र आले की, जेष्टांसाठी आणि महिलांसाठी सुखसुविधा घेऊन येतील. तसेच दोघांच्या भेटीमुळे शिवसेना खूप पुढे जाईल त्यामुळे नक्कीच देशाचा कायापालट होईल. युवासेनेमुळे नवीन पिढीला देशासाठी काय करावे याची माहिती मिळेल. आदित्य ठाकरे यांच विकासाच्या दृष्टीने कायम चांगलं योगदान राहिले आहे. युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आदित्य ठाकरे नेहमी तत्पर असतात. हे दोन नेतृत्व एकत्र आल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या, शिक्षणा संबंधी समस्या तसेच अनेक नवीन संधी देखील उपलब्ध होतील.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी