32 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रफडणवीस आणि शहा यांच्यात नेमकं बिनसलंय काय ?

फडणवीस आणि शहा यांच्यात नेमकं बिनसलंय काय ?

टीम लय भारी

नागपूर : आधी विरोधी पक्ष नेते असलेले देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्राच्या सत्तेत उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत. भाजप आणि शिंदे गट यांच्याकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाची घोषणा करण्यात आली. पण त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर वेगळेच हावभाव पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यापासून देवेंद्र फडणवीस यांचा उत्साह कमी झाल्याचे सर्वच राजकारण्यांकडून सांगण्यात आले.

देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या पक्ष श्रेष्ठींनी उपमुख्यमंत्री पदी बसायला भाग पाडले. याबाबत सर्वत्र चर्चा करण्यात येत होती. पण हे कुठे ना कुठे खरे असल्याचे आता समोर येऊ लागले आहे. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदी बसल्यानंतर ते आज (दि. ५ जुलै २०२२) नागपूरमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांची स्वागत रॅली देखील काढण्यात आली.

या स्वागत रॅलीमधील बॅनरने मात्र यावेळी सगळ्यांचे लक्ष वेधले. देवेंद्र फडणवीसांच्या स्वागत रॅलीमधील बॅनरवरून अमित शहांना वगळण्यात आले आहे. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे.पी. नड्डा, नितीन गडकरी आणि चंद्रकांत पाटील यांना स्थान देण्यात आले. पण या बॅनरवर अमित शहांचा फोटो लावणे टाळण्यात आले. या बॅनरवर ‘जनादेश मिळूनही पक्षादेश पाळणारा नागपूरचा लाडका सुपुत्र’ असेही लिहिण्यात आले आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण असल्याने त्यांना पक्षाकडून जाणीवपूर्वक बाजूला सारण्यात आल्याच्या चर्चांना देखील ऊत आला होता. पण आता हे जाणीवपूर्वक करण्यात आले की चुकीने झाले हे मात्र कळू शकले नाही. उपमुख्यमंत्री पदी बसल्यापासून देवेंद्र फडणवीस हे जरा वेगळे भासू लागले आहेत. राज्यातील सत्तांतरात देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाचा वाटा असला तरी, कमी आमदार असलेल्या व्यक्तीला भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री पदी बसविण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा :

बाळासाहेब थोरातांच्या कन्येने मनसे नेत्याला फटकारले!

सभागृहाला शिस्त लावण्याचे काम अध्यक्षांचे : बाळासाहेब थोरात

माझी टिंगल करणाऱ्यांचा मी बदला घेणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी