27 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरमहाराष्ट्रएकनाथ शिंदे 25 वर्षे गप्प का बसलात ?

एकनाथ शिंदे 25 वर्षे गप्प का बसलात ?

टीम लय भारी

मुंबई: आज मालेगाव येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा समाचार केदार दिघे यांनी सोशल मीडियावर घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार …..त्यावर केदार दिघेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रति प्रश्न विचारला आहे.

‘मग मी म्हणतो इतके दिवस गप्प का बसलात.. माहित असूनही तुम्ही 25 वर्षे गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी आणि दिघे साहेबांशी सर्वात मोठी प्रतारण तुम्ही केली आहे. सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल, असे वक्तव्य त्यांनी सोशल मीडियावर केले आहे. केदार दिघे हे आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिघे साहेबांच्या मृत्यूचं भांडवल करुन मानात स्थान निर्माण करु पाहात आहेत. हे बोलण्यासाठी त्यांनी नाशिकचा आधार घेतला आहे.

राज्याच्या राजकारणाला एक वेगळे वळणं लागले आहे. मोठे मोठे नेते बेधडक वक्तव्य करत आहेत. त्यात राज्याचे मुख्यमंत्री अग्रेसर आहेत. सातत्याने ते दिल्लीला खेटा मारत आहेत. शिवाय उध्दव ठाकरेंवर टीका करण्याची संधी ते सोडत नाही. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मालेगावला होते. मालेगावच्या सभेत त्यांनी अनेक योजनांचा उच्चार केला आहे. त्याच बरोबर त्यांनी उध्दव ठाकरे आणि परिवाराला लक्ष केले.

आजच्या सभेत त्यांनी धर्मवीर आनंद दिघेंविषयी उल्लेख केला होता. आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार …..असा धमकी वजा इशाराच त्यांनी आज उध्दव ठाकरेंना दिला.

हे सुध्दा वाचा:

तुमच्याकडे पाशवी बहूमत आहे – शरद पवार

‘महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले’-अजित पवार

VIDEO : राष्ट्रवादी काँग्रेसकडून हुतात्मा चौकात राज्यपालांविरोधात आंदोलन

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!