28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रराजनाथ सिंह ‘सलाम वालेकूम‘ का म्हणाले?

राजनाथ सिंह ‘सलाम वालेकूम‘ का म्हणाले?

टीम लय भारी

नवी दिल्ली: देशात सध्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीचे धोरण ठरविण्याची जबाबदारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना दिली आहे. त्यामुळे ते सध्या विविध नेत्यांना संपर्क साधत आहेत. राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांनाचा पाठिंबा दया. हे सांगण्यासाठी राजनाथ सिंह यांनी उध्दव ठाकरेंना फोन केला होता. त्यावेळी त्यांनी ‘सलाम वालेकुम‘ म्हटले. राजनाथ सिंह नेमके उध्दव ठाकरेंनाच सलाम वालेकुम का? म्हणाले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. उध्दव ठाकरेंनी माजी आमदारांच्या बैठकीत बोलतांना हा प्रसंग सांगितला.

उध्दव ठाकरे हे एक हिंदुत्त्ववादी नेते आहेत. तसेच राजनाथ सिंह देखील हिंदुत्त्ववादी नेते आहेत. त्यामुळे राजनाथ सिंह यांच्या या वक्तव्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उध्दव ठाकरेंना या वक्तव्यावरुन संताप आला. त्यांनी राजनाथ सिंह यांना आम्ही आमचे हिंदूत्व सोडलेले नाही असे सांगितले. त्यानंतर राजनाथ सिंह त्यांना ‘जय श्री राम‘ म्हणाले. उध्दव ठाकरेंनी एनसीपी बरोबर महाविकास आघाडी सरकार स्थापन केले होते. त्यानंतर त्यांच्या हिंदूत्वावरुन भाजप नेते त्यांना नेहमीच लक्ष करत आहेत. भाजपने कुट नितीचा अवलंब करुन शिवसेनेला खिंडार पाडले.

आता शिवसेना पक्ष प्रमुखांना आशा प्रकारे डिवचले. ही गोष्ट हिंदुत्त्वाचा पुरस्कार करणारी नसून, हिंदुत्त्वाला हुकूमशाहीकडे नेणारी आहे. भारत देश हा राजघटनेवर चालतो. राजघटनेमध्ये सर्वधर्म समभाव सांगितला आहे. मग राजनाथ सिंह केवळ एका धर्माला का टार्गेट करत आहे. दोन मुस्लिम माणसं एकमेकांना भेटल्यावर ‘सलाम वालेकूम‘ बोलतात. तर हिंदू नमस्कार, नमस्ते, रामराम वगैरे शब्द वापरतात. नुकताच मुस्लिम धर्मियांचा बकरी ईद सण साजरा झाला. या सणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘सलाम वालेकूम‘ शब्द वापरला का? जर त्यांनी मुस्लिम बांधवांच्या सणाच्या भावना समजून ते बोलले असतील तर ठिक आहे. मग ते सर्वधर्म समभाव जपतात असा संदेश देशात जाईल.

केंद्रातील मोठे नेते महाराष्ट्रातील नेत्यांना आपल्या मुठीत ठेवू पाहत आहेत. त्यांच्यावर दबाव आणून त्यांना आपल्या पुढे झुकवण्याचा प्रयत्न करत आहे. हे भाजपच्या मोठया नेत्यांनी कबूल केले आहे. शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांना फूस लावून पळवून नेले आणि महाराष्ट्रातील वातावरण अशांत केले. महाराष्ट्राची सुबत्ता दिल्लीकरांच्या डोळयात खुपते. त्यामुळेच देशातून महाराष्ट्राला मागे आणण्याचे षडयंत्र भाजपचे मोठे नेते आखत आहेत. महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकणार नाही हे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आजही गर्जून सांगतात. त्यामुळे त्यांना नतमस्तक करण्यासाठी, त्यांना चिडवण्यासाठी, त्यांना कमी लेखण्यासाठी हे मोठे असलेले नेते असे वक्तव्य करतात असा संशय कोणालाही आल्या शिवाय राहणार नाही.

हे सुध्दा वाचा:

उद्धव ठाकरेंविरोधात संतोष बांगर यांचे मुंबईत शक्ती प्रदर्शन

पुण्याची पाणीबाणी टळली

काय….? डासांपासून होणार आता लवकरच सुटका

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी