30 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरमहाराष्ट्र'गुड बाय..'चा मॅसेज करत महिलेची दोन मुलांसह आत्महत्या

‘गुड बाय..’चा मॅसेज करत महिलेची दोन मुलांसह आत्महत्या

टीम लय भारी

बुलढाणा : जिल्ह्यात असलेल्या करडी धरणात एका ३० वर्षीय महिलेने उडी घेऊन आत्महत्या (Woman commits suicide) केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांना घेऊन या धरणाच्या पाण्यात उडी घेतली (Woman commits suicide with two children while texting ‘Good bye..’). सरिता ज्ञानेश्वर पैठणे असे आत्म्हत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला आपल्या कुटुंबासोबत धाडजवळ करडी या गावात राहण्यास होती. या घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी करडी धरणाच्या परिसरात गर्दी केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सरिता पैठणे या आपल्या पती आणि दोन मुलांसोबत औरंगाबाद येथे वास्तव्यास होते. पण दोन दिवसांपूर्वीच ते चौघेही आपल्या गावी करडी येथे परत आले होते. पण काल (दि. २७ जुलै २०२२) सरिता यांनी त्यांचा भाऊ शरद कौतिकराव दामोदर याला ‘गुड बाय.. आम्ही जग सोडून जातोय’ असा मॅसेज केला. त्यानंतर लगेच शरद यांनी बहिणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही. यानंतर त्यांनी सरिताचे पती ज्ञानेश्वर यांनी कॉल केला. यावेळी शरदने सरिताकडे फोन द्या, असे सांगितले. पण सरिता त्यांची मुलगी वेदिका (वय वर्षे ११) आणि मुलगा वंश (वय वर्षे ९) यांना घेऊन पहाटे पासून कोणालाही न सांगता निघून गेल्याचे सांगण्यात आले.

याबातबतची माहिती मृत महिला सरिता हिचा भाऊ शरदला मिळताच त्याने करडी गाव गाठले. यानंतर त्यांनी धाड पोलिसांत तक्रार दाखल करून मृत महिलेच्या पती, सासू-सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, गुन्हा दाखल केल्यानंतर सरिता यांचा मृतदेह करडी धरणाच्या पाण्यावर तरंगताना दिसून आला. यानंतर सरिता यांच्या दोन्ही चिमुकल्यांचा शोध पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. मृत विवाहित महिला सरिता यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून सरिताच्या पती, सासू आणि सासरे यांच्याविरोधात भादवी कलम ३०६, ४९८-अ, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा :

सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे हाती बांधणार शिवबंधन

अजित पवारांची थेट शेतकऱ्यांसोबत बांधावर चर्चा

गावातील खराब रस्त्याने घेतला चिमूरड्याचा जीव

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!