25 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरमहाराष्ट्रBharat Jodo Yatra : सोने गहाण ठेऊन सिलेंडर घेतला, पण...

Bharat Jodo Yatra : सोने गहाण ठेऊन सिलेंडर घेतला, पण गॅस १२०० रुपये झाला; मेडशीच्या महिलांनी मांडल्या व्यथा

रोज दोनशे रुपये हजेरीवर शेतात मजुरीला जातो. पण सरकारने आमचे रेशन बंद केले आहे. आता गहू, तांदुळ, ज्वारी सगळंच महागलय.

“गरिबाला स्वस्त धान्य मिळायला पाहिजे. स्वस्तात गॅस पाहिजे. मदत मिळायला पाहिजे, नाहीतर आम्ही जगायचे कसे? आमची पोरं कशी शिकणार ?” हा प्रश्न आहे मेडशीच्या पद्मिनी सुरेश थोरात यांना पडलेला त्या शेतमजूर आहेत, अशिक्षित आहेत. त्यांचा राजकारणाशी संबंध नाही. पण राहुल गांधी यांचे भाषण ऐकायला त्या उपस्थित होत्या.

रोज दोनशे रुपये हजेरीवर शेतात मजुरीला जातो. पण सरकारने आमचे रेशन बंद केले आहे. आता गहू, तांदुळ, ज्वारी सगळंच महागलय. गळ्यातले सोने गहाण ठेऊन आम्ही गॅस सिलेंडर घेतला होता. स्वस्तात गॅस मिळेल अशी आशा होती पण गॅस 1200 रुपये झाला. दिवसभर कष्ट करून रोज दोनशे कमवणारे गॅस घेऊ शकत नाहीत. आता पुन्हा आम्ही चूल पेटवली आहे. म्हणून गरिबाला रेशन आणि गॅस स्वस्तात मिळायला हवा, असे त्या म्हणाल्या.

मेडशीत अनेक महिलांची अशीच स्थिती. येथील 80 टक्के कुटुंबे शेतमजुरीवर गुजरण करतात. त्यांना राहुल गांधी गरिबांसाठी काहीतरी करतील याची खात्री आहे.

भारत जोडो यात्रा बुधवारी रात्री अकोला जिल्ह्यातील पातूर येथे दाखल झाली होती. गुरुवारी सकाळी सहा वाजता पातूर येथून सुरू झालेली यात्रा चेंन्नी फाटा, वाडेगाव येथे दुपारची विश्रांती घेऊन संध्याकाळी वाडेगाव, बाळापूर येथे मुक्कामी पोहोचली. बुधवारी रात्री मेडशी (वाशीम) येथे तुफान गर्दी झाली होती. तर मेडशी ते पातूर सुमारे 18 किलोमीटरचे जंगल क्षेत्र वाहनाने पार केल्यानंतर पातूर येथे मुकाम झाला.

पातूर येथून पहाटे मोठ्या जल्लोषात यात्रेला प्रारंभ झाला. सोलापूर, सांगली, यवतमाळ आणि नागपूर येथील लोक मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले होते. दुपारी वाडेगाव मध्ये राहुल गांधींच्या स्वागतासाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. ज्ञानेश्वर हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथक आणि देशभक्तीपर गीतांनी राहुलजींचे स्वागत केले. तर भारडे कुटूंबियांच्या इमारतीच्या छतावर अनेक महिला उभ्या होत्या. त्यांना भेटण्यासाठी राहुलजी त्यांच्या छतावर गेले. मग त्यांच्या आंनदाला पारा उरला नाही.

हे सुध्दा वाचा :

Video : भारत एकजुटीने पुढे जावा, म्हणून आम्ही ‘भारत जोडो यात्रेत’!

Bharat Jodo Yatra : देवेंद्र फडणवीसांनी सावरकरांचा माफीनामा पहावा!; राहूल गांधींचा टोला

Underworld Dawn : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याची निर्दोष मुक्तता

वाडेगाव ते बाळापूर दरम्यान दुपारच्या सत्रात बाळासाहेब थोरात व त्यांची कन्या जयश्री थोरात पदयात्रेत सहभागी झाले होते. मेधा पाटकर आणि स्वयंसेवी कार्यकर्त्यासह पदयात्रेत चालत होत्या. तर सकाळच्या सत्रात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी कार्यकर्त्यांसह दाखल झाले होते.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!