30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रSharad Pawar : निवडणुकीसाठी कामाला लागा; शरद पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Sharad Pawar : निवडणुकीसाठी कामाला लागा; शरद पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

राज्यातून प्रकल्प बाहेर जात आहेत, याची सरकारला काळजी नाही. सध्याचे सरकार काय व कुठे आहे ? हे समजत नाही. राज्यात ओला दुष्काळ आहे. शेतकरी मदत मिळण्याची वाट बघत आहे. पण सरकार कुठे आहे ? असा प्रश्न पडतो. आगामी काळात आपला पक्ष वाढवावा लागेल. पुरोगामी विचारांची कास सोडू नका, निवडणुकीसाठी कामाला लगा, असे आवाहन शरद पवार यांनी शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरात केले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गेल्या तीन चार दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातच शिर्डी येथे ‘राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा’ हे पक्षाचे शिबिर काल पासून सुरू आहे. शरद पवार या शिबिराला उपस्थित राहणार की नाही अशी चर्चा सुरू असतानाच ते आज या शिबिरासाठी उपस्थित राहीले आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. तब्बेत बरी नसताना देखील सगळ्यांच्या इच्छेचा मान राखण्यासाठी मी या शिबिराला आलो असे सांगत पक्ष मजबूत करा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. मला डॉक्टरांनी दहा-पंधरा दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. तरी देखील मी इथे तुमच्यासाठी आलो कारण मला कार्यकर्त्यांवर विश्वास आहे, असे देखील पवार यावेळी म्हणाले. कार्यक्रमात पवार यांनी खुर्चीवर बसुन छोटेसे भाषण केले. त्यानंतर त्यांनी आपल्या भाषणाचा कागद दिलीप वळसे-पाटलांकडे सोपवला आणि पुढे वळसे-पाटलांनी शरद पवारांचे संपूर्ण भाषण वाचून दाखवले.
हे सुद्धा वाचा :
Uddhav Thakeray : ‘मध्यवर्ती निवडणूकांसाठी तयार रहा!’ उद्धव ठाकरेंच्या विधानानंतर महाराष्ट्राचं राजकारण हादरलं

Mumbai Mantralaya : मंत्रालय आहे की, टुरिंग टॉकीज?

Maharashtra Politics : आमदार फुटीच्या वक्तव्यावरून काँग्रेस-ठाकरे गटात ‘तू-तू.. मैं-मैं’

शरद पवार म्हणाले की, मला सविस्तर बोलणं शक्य नाही, कारण मला डॉक्टरांनी दहा ते पंधरा दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. जास्त बोलू नका असे म्हटले आहे. तरीसुध्दा मी तुमच्यासाठी आज इथे आलो. मला कार्यकर्त्यांवर विश्वास आहे. माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे जास्त बोलू शकत नाही. यावेळी वळसे पाटील यांनी पवारांचे भाषण वाचून दाखवले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी