33 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रलवकरच महाराष्ट्र पोलिसांनाही ‘वर्क फ्रॉम होम'

लवकरच महाराष्ट्र पोलिसांनाही ‘वर्क फ्रॉम होम’

टीम लय भारी

मुंबई : ज्या कर्मचाऱ्यांना कॉमोरबिडीटीचा त्रास आहे त्यांना त्यांचे वय कितीही असो त्यांना ‘कार्यालयीन काम’ देण्यात यावे जे सामाजिक संपर्कांद्वारे व्हायरसच्या संपर्कात येणार नाही याची खात्री करेल.अशी मागणी केली जात होती. त्यायच ५५ वर्षावरील कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम करता येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली(‘Work from Home’ to Maharashtra Police soon).

पोलिस कर्मचाऱ्यांना जास्त प्रमाणात कोरोनाची लागण झाली तर त्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी प्रशासन सज्ज आहे.तसेच आपण ५५ वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा आदेश दिला आहे. त्यांनी कर्तव्यावर न येता घरुन काम करायचं आहे. आणि पोलिसांसाठी वैद्यकीय व्यवस्था तयार असेल असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात कठोर निर्बंधांबाबत निर्णयाची शक्यता

Maharashtra Corona, omicron : कोरोनाचा आकडा 26 हजारांच्या पार, तर ओमिक्रॉनचे तब्बल 144 रुग्ण

भारतात दररोज कोरोनाची रुग्णसंख्या दुप्पटीने वाढत आहे. यातच आता दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नव्याने आढळलेला ओमिक्रॉन व्हेरिएंटने आता जगभरासह भारतातदेखील आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत याची संख्या जादा असल्याने लाॉकडाऊन लागेल का याची भिती लागून राहिली असतानात पोलिस कर्मचाऱ्यांना देखील जादा प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील माध्यमांशी संवाद साधला.

कोरोनाला थोपवण्यासाठी मोठे पाऊल, IMA च्या महाराष्ट्र शाखेकडून टास्क फोर्सची स्थापना, उपचार पद्धतीविषयी माहिती देणार

Mumbai: 71 police personnel test positive for Covid-19 in 24 hours

बुधवारी दिवसभरात तब्बल २६ हजार ५३८ नव्या करोनाबाधितांची भर राज्याच्या एकूण आकड्यामध्ये झाली . त्यामुळे राज्यातल्या अॅक्टिव्ह करोनाबाधिताचा आकडा आता ८७ हजार ५०५ इतका वाढला आहे. त्यासोबतच राज्यातील ओमायक्रॉनच्या एकूण बाधितांचा आकडा देखील तब्बल ७९७ वर गेल्यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी