जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या डी. गुकेशचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गुकेशची प्रशंसा करतांना म्हटले की, गुकेशची कामगिरी ऐतिहासिक आहे आणि ती युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल. (World champion Gukesh’s performance is historic Chief Minister Devendra Fadnavis)
दिल्लीतील संमेलन स्थळाला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी नाव
मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात,’ डी. गुकेशने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे भारताची मान जगात उंचावली आहेच. त्याचबरोबर आपल्या देशाचा बुद्धिबळाच्या क्षेत्रातील दबदबा आणखी वाढला आहे.’ विश्वनाथन आनंदच्या कामगिरीमुळे देशातील मुलांना बुद्धिबळाची आवड निर्माण झाली. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक बुद्धिबळपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवली. आता याच कामगिरीची परंपरा गुकेश समर्थपणे पुढे नेईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. (World champion Gukesh’s performance is historic Chief Minister Devendra Fadnavis)
धोंडीराम दादा वाघमारे यांनी केली महाराष्ट्रात संविधान दिन साजरा करण्याची सुरुवात
डी गुकेशने 18व्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत चीनचा बुद्धिबळपटू डिंग लिरेनचा पराभव करून किंग्स गॅम्बिटचे विजेतेपद पटकावले. हा मुकुट धारण करणारा तो जगातील पहिला किशोर आहे. या विजयापूर्वी गुकेश जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर होता. गुकेशच्या आधी, सर्वात तरुण बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियन गॅरी कास्परोव्ह होता, ज्याने वयाच्या 22 व्या वर्षी चॅम्पियनशिप जिंकली होती. (World champion Gukesh’s performance is historic Chief Minister Devendra Fadnavis)