28 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरमहाराष्ट्र'लय भारी'चे व्यवस्थापकीय संपादक तुषार खरात यांना यशवंत रत्न पुरस्कार

‘लय भारी’चे व्यवस्थापकीय संपादक तुषार खरात यांना यशवंत रत्न पुरस्कार

‘लय भारी’चे (Lay Bhari) व्यवस्थापकीय संपादक तुषार खरात (Tushar Kharat) यांना प्रतिष्ठेचा यशवंत रत्न पुरस्कार (Yashwant Ratna Award) जाहीर झाला आहे. पुण्यातील चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर जयंती उत्सव समितीचा हा पुरस्कार आहे. येत्या रविवारी (दि.15) पुण्यात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. (Yashwant Ratna Award to Tushar Kharat, Managing Editor of ‘Lay Bhari’)

महाराजा यशवंतराव होळकर जयंती उत्सव समितीतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना यशवंतरत्न पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यात लय भारी डॉट इन (laybhari.in) डिजीटल मीडियाचे व्यवस्थापकीय संपादक तुषार खरात यांना प्रसारमाध्यम क्षेत्रात उल्लेखणीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुण्यश्लोक साप्ताहिकाचे संपादक गणेश पुजारी यांना यशवंतरत्न जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर लुसी कुरीयन (सामाजिक क्षेत्र), गणेश हाके (शैक्षणिक), सुप्रिया बडवे (उद्योग), संतोष गायके (क्रीडा), विवेक खिलारे (कृषी), सुखदेव जमदाडे आणि प्रदीप भोर (प्रशासकीय सेवा), डॉ. प्रविण सहावे (वैद्यकीय), प्रमोद परदेशी (युवा), रुपाली जोशी (महिला) तसेच पुण्यातील आई कलाग्राम फाउंडेशन सामाजिक संस्था यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय, विठ्ठल काटे, अंकुशराव भांड, दिपक भोजने, सौरभ हाटकर यांना यशवंतरत्न विशेष कार्य सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुण्यातील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स येथे येत्या रविवारी (दि.15) महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण कार्यक्रम होईल. ‘चाणक्य मंडळ’चे संस्थापक अविनाश धर्माधिकारी आणि इतिहास अभ्यासक यशपाल भिंगे या कार्यक्रमात प्रमुख वक्ते असतील.

हे सुद्धा वाचा

‘लय भारी’ कार्यालय उद्घाटन सोहळ्याची क्षणचित्रे

‘लय भारी’चे धाडस तरूणांसाठी प्रेरणादायी : बाळासाहेब थोरात

Lay Bhari : ‘लय भारी’च्या संपादकपदी विक्रांत पाटील यांची नियुक्ती !

इंदूर संस्थानच्या होळकर घराण्याचे 13वे वंशज भूषणसिंह होळकर, आमदार दत्ता भरणे, आमदार राम शिंदे, आमदार सुनील कांबळे, उद्योजक विवेक बिडगर, निवृत्त पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, डॉ. अनिल दुधभाते, माजी आमदार रामराव वरकुटे, राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, रासपचे पुणे जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर आदी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराजा यशवंतराव होळकर यांच्या अपरिचित विरश्रिचा इतिहास उजेडात येण्यास मदत होईल असे समितीचे अध्यक्ष विजय गोफणे व सचिव सोमनाथ देवकाते यांनी सांगितले संयोजन समितीचे पदाधिकारी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यरत आहेत. कार्यक्रम रविवार दि 15.1.2023 रोजी सकाळी 10.30 वाजता मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, स्वारगेट, पुणे येथे असणार आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी