28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रउत्त्कृष्ठ मराठी वाङ्मयासाठीचे यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर

उत्त्कृष्ठ मराठी वाङ्मयासाठीचे यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर

सन २०२१ साठी उत्त्कृष्ठ मराठी वाङ्मय निर्मितीसाठी यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

सन २०२१ साठी उत्त्कृष्ठ मराठी वाङ्मय निर्मितीसाठी यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले असून कवी रमजान मुल्ला, लेखक प्रशांत बागड, लेखिका श्वेता सीमा विनोद, लेखक अनिल साबळे, लेखिका ड़ॉ. निलीमा गुंडी, लेखक शरद बाविस्कर, लेखिका दिपा देशमुख, लेखक सचिन होळकर, सुखदेव थोरात, अरुण गद्रे, इतिहास अभ्यासक शशिंकांत पित्रे आदीसह बालसाहित्य, कृषी, पर्यावरण, समीक्षा आदी साहित्यकृतींसाठी लेखकांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
कवी रमजान मुल्ला यांच्या अस्वस्थ काळरात्रीचे दृष्ठांत कविता संग्रहाला बहिणाबाई चौधरी पुरस्कार, प्रशांत बागड यांच्या नवल कादंबरीला हरी नारायण आपटे पुरस्कार, लेखिका श्वेता सीमा विनोद यांच्या आपल्याला काय त्याच… कादंबरीला श्री. ना. पेंडसे पुरस्कार अनिल साबळे यांच्या पिवळा पिवळा पाचोळा या लघुकथा संग्रहाला दिवाकर कृष्ण पुरस्कार, डॉ. निलीमा गुंडी यांच्या आठवा सुरू या ललित गद्यासाठी अनंत काणेकर पुरस्कार, शरद बाविस्कर यांच्या भुरा या आत्मचरित्रासाठी लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार, दिपा देशमुख यांच्या जग बदलणारे ग्रंथ या पुस्तकाला श्री. के. क्षिरसागर पुरस्कार, सचिन होळकर यांच्या शेती शोध आणि बोध या कृषी विषयक पुस्तकाला वसंतराव नाईक पुरस्कार, सुखदेव थोरात यांच्या वंचितांचे वर्तमान या वंचितांच्या साहित्यकृतीला लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार, अरुण गद्रे यांच्या उत्क्रांती: एक वैज्ञानिक अंधश्रद्धा या विज्ञानपर साहित्यकृतीला महात्मा जोतीराव फुले पुरस्कार, इतिहास अभ्यासक शशिंकांत पित्रे यांच्या जयतु जयतु शिवाजी या इतिहासविषयक पुस्तकाला शाहू महाराज पुरस्कार प्राप्त झाला आहे.

त्याच बरोबर हबीब भंडारे यांच्या जगणं विकणाऱ्या माणसांच्या कविता या काव्यसंग्रहाला कवी केशवसुत पुरस्कार, नारायण जाधव यळगावकर यांच्या यशोधरा नाट्य/ एकांकिका पुस्तकास राम गणेश गडकरी पुरस्कार, विश्वास ठाकुर यांच्या नात्यांचे सर्व्हिसिंग या लघुकथापर पुस्तकासाठी ग.ल. ठोकळ पुरस्कार, विणा सामंत यांच्या साठा उत्तराची कहाणी… या ललित गद्यासाठी ताराबाई शिंदे पुरस्कार, राजा गायकवाड यांच्या गढीवरुन या विनोदी लेखणासाठी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार जाहीर झाला आहे.

चरित्र लेखन, समीक्षा, कृषी पर्यावरणविषयक लेखनासाठी पुरस्कार
वंदना बोकील- कुलकर्णी यांच्या रोहिणी निरंजनी या चरित्रासाठी नं.चि. केळकर पुरस्कार, प्रा. डॉ. प्रकाश शेवाळे यांच्या अनुष्टुभ नियतकालिकाचे वाड्मयीन योगदान या समीक्षापर ग्रंथाला रा.भा. पाटणकर पुरस्कार, सुरेश भटेवरा यांच्या शोध नेहरु-गांधी पर्वाचा या पुस्तकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, सदानंद कदम यांच्या मराठी भाषेच्या जडणघडणीची कहाणी वाक्यप्रचाराची या पुस्तकाला नरहर कुरुंदकर पुरस्कार, डॉ. आर.के. अडसुळ यांच्या सुखाचे मानसशास्त्र या पुस्तकासाठी ना.गो. नांदापूरकर पुरस्कार, डॉ. साहेबराव भुकन यांच्या विनोबा आणि शिक्षण या पुस्तकाला कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार, विद्यानंद रानडे यांच्या पाण्या तुझा रंग कसा? या पुस्तकाला डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार, किशोर मेढे यांच्या दलित भारत दलित भारतमधील अग्रलेख या पुस्तकाला रा.ना. चव्हाण पुरस्कार मिळाला आहे.
अनुवादपर लेखनासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर अनुवादक अनघा लेले यांच्या फ्रॅक्चर्ड फ्रिडम: तुरुंगातील आठवणी व चिंतन या अनुवादीत पुस्तकाला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार, आनंद करंदीकर यांच्या वैचारिक घुसळण या पुस्तकाला भाई माधवराव बागल पुरस्कार जाहीर झाला आहे.
हे सुद्धा वाचा
गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला ब्रेक, पुढील आदेशापर्यंत कारवाई न करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
साकेत गोखलेंना नडले मोदींच्या मोरबी भेटीचे ट्विट, गुजरात पोलिसांनी केली अटक!
PHOTO : चैत्यभूमीवर देशभरातून लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायांचा महासागर लोटला

बाल साहित्य पुरस्कार
तसेच विवेक उगलमुगले यांच्या ओन्ली फॉर चिल्ड्रेन या बालकाव्यासाठी बालकवी पुरस्कार, डॉ सोमनाथ मुटकुळे यांच्या खेळ मांडियेला या बालवाड्मय एकांकिका/ नाटकासाठी भा. रा. भागवत पुरस्कार, वृषाली पाटील यांच्या पक्षी गेले कुठे? या बालवाड्मय कादंबरीसाठी साने गुरूजी पुरस्कार, सुहासिनी देशपांडे यांच्या किमयागार या बालकथा पुस्तकासाठी राजा मंगळवेढेकर पुरस्कार, सुधाकर चव्हाण यांच्या चला शिकुया वारली चित्रकला या बालवाड्मय छंदात्मक पुस्तकाला यदुनाथ थत्ते पुरस्कार, विद्या सुर्वे-बोरसे यांच्या कोरा कागद निळी शाई या बालवाड्मयास ना. धो. ताम्हणकर पुरस्कार, परेश प्रभु यांच्या गोपालकृष्ण भोबे चरित्र आणि साहित्य सयाजी महाराज गायकवाड, सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार जाहीर झाला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी