33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रतुमच्याकडे पाशवी बहूमत आहे - शरद पवार

तुमच्याकडे पाशवी बहूमत आहे – शरद पवार

टीम लय भारी

मुंबईः राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज धुळे येथे राष्ट्रवादी काॅंग्रेस कार्यालयाच्या नुतनीकरण प्रसंगी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि राज्यपालांचा खरपूस समाचार घेतला. राज्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे. खानदेशात ठिकाणी अतिवृष्टीने नुकसान झाले. यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी अतिवृष्टी झाली. विरोधी पक्ष नेते अजित पवार त्या भागामध्ये पहाणी करत आहेत.

यावेळी ते म्हणाले, पक्षाची वास्तू अडचणीत होती. ती निटनेटकी केली. त्यामुळे मला आग्रहाने बोलावले. त्यामुळे मी येथे आलो. या शहरातील सामान्य माणसांना विश्वास वाटला. लोकांच्या विश्वासाला आपण किती पात्र आहोत. चंद्रकांत खैरे यांनी जागेसाठी सहकार्य केले. महानगर पालिकेने सहकार्य केले. अनिल गोटे यांचे देखील शरद पवार यांनी अभिनंदन केले.

सत्तेमध्ये काही दोष निर्माण होतात. आपण देशाचे मालक आहोत, असे चित्र निर्माण केले आहे. मतं ऐकून घेण्याचे सौजन्य दाखवावं लागते. तुमच्या कडे बहूमत आहे. ते पाशवी बहूमत आहे. काॅंग्रेस पक्षाच्या एका खासदाराकडून एक चुकीचा शब्द वापरला त्यांनी राष्ट्रपतींची माफी मागितली. जो बोलला त्यावर काही बोललेले नाही. विधान एकाने केले माफी सोनिया गांधींना मागायला सांगितली. सोनिया गांधी भाजपच्या महिला खासदारांना विचारायला गेल्या तर सगळे लोक सोनिया गांधींच्या वर धावून आले. काही साखदारांनी त्यांनी बाजूला नेत गाडीत बसवले. हे काम तिथे झाले नसते तर सबंध देशात वेगळा मॅसेज गेला असता.

अलिकडे टोकाची भूमीका सगळीकडे घेतली जात आहे. राज्यपालांनी राज्याच्या विधानसभा अध्यक्ष निवडीच्या प्रस्तावावर दोन वर्षे सही केली नाही. नवीन सरकार आल्यावर दोन दिवसांत अध्यक्ष निवडला गेला. आशा प्रकारे त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या भूमीकेचा खरपूस समाचार घेतला. आता पार्लमेंटमध्ये सगळी सत्ता मुठीत ठेवल्यासारखी आहे. लोकशाहीत वेगवेगळी मत असतात. संकटे सगळीकडे आहेत. बेरोजगारांची परिस्थिती वाईट आहे. आम्ही एका वेगळया रस्त्यांने देश चालवत आहोत. अशा परिस्थितीमध्ये या देशातील सामान्य माणसाने इंग्रजांचा पराभव केला. देशात एक प्रकारचे दमदाटीचे वातावरण तयार केले जात आहे. सामान्य माणूस त्यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही.

राष्ट्रवादी राज्यातील जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी उभा राहिल. एक नवा इतिहास घडवेल. प्रत्येक तालुक्यात भेटीगाठी घेवू. सुसंवाद साधू राष्ट्रवादीचा झेंडा देशात फडकवू. त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महत्वाचा निर्णय घेतला. तो म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचा. अधिकाधिक लोकांच्या हातात सत्ता केली. त्यांनी पंचायत राज्याची स्थापना केली. निर्णय घेण्याचा अधिकार शेवटच्या माणसाकडे दिला.असे शरद पवार या वेळी म्हणाले

हे सुध्दा वाचा:

‘महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले’-अजित पवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना ‘आगडम तगडम‘ काम नको

बाळासाहेब ठाकरे असते तर, राज्यपालांना धुतलं असतं

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी