29 C
Mumbai
Monday, September 11, 2023
घरमहाराष्ट्रअबब ! वेश्यांनी ड्रग्ज दिल्याने तरूणाचा मृत्यू, पोलिसांकडून प्रकरण दडपण्यासाठी आटापीठा !

अबब ! वेश्यांनी ड्रग्ज दिल्याने तरूणाचा मृत्यू, पोलिसांकडून प्रकरण दडपण्यासाठी आटापीठा !

मुंबईतील एका कुंटणखाण्यात वेश्यागमनासाठी आलेल्या एका ग्राहकाला ड्रग्ज दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणाची खोलात जावून चौकशी केली जावी तसेच दोषींवर कारवाई व्हावी यासाठी राज्याच्या नशामुक्ती मंडळाचे सचिव अमोल मडामे यांनी डी.बी. मार्ग पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडे मागणी केली असता हे प्रकरण दडपूण टाकण्यासाठी पोलिसांचा आटापीठा सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मडामे यांनी अखेर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे पोलीस आयुक्तांना याबाबत पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे.

याबाबत मडामे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे की, डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत कांग्रेस हाऊस, सिम्पल टाइम्स हा परिसर असून. येथे वेश्या व्यवसाय चालतो. कांग्रेस हाऊस मधील एका कुंटणखाण्यात तीन दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा (गिऱ्हाईकाचा) मृत्यू झाला असल्याचे त्यांनी पत्रात नमुद केले आहे.
या ग्राहकाचा मृत्यू मृत्यू MD या अंमली पदार्थाच्या सेवनामुळे झाला आहे. हा मृत्यु कुंठणखाण्याच्या आतमध्ये झाला होता. परंतु कुंटनखाण्याच्या चालकाने मृतदेह बाहेर काढून त्या व्यक्तीचा मृत्यू बाहेर झाल्याचा देखावा केला. तसेच या मृत्युचे खरे कारण समोर येवू नये म्हणून कुंटणखाना चालकाने ‘मृत्यु नैसर्गिक झाल्याचा’ कांगावा सुरू केला आहे, असल्याची खळबळजनक माहिती गडामे यांनी पत्रातून दिली असून या प्रकरणाची खोलात जावून चौकशी करण्याची मागणी मडामे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
मडामे यांनी या पत्रात स्फोटक खुलासे केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ग्रँट रोड परिसरातील वेश्यालयांमध्ये MD या ड्रग्जचा व्यापार मोठ्या भयानक पद्धतीने वाढलेला आहे. प्रत्येक कुंठणखाण्यात बेसुमार पद्धतीने MD चा पुरवठा केला जातो. कुंटणखानाचालक जाणीवपूर्वक गिऱ्हाईकांना फसवून तर कधी लालुच दाखवून MD ड्रग्ज घ्यायला लवतात. वेश्या कधी पाण्यातून, तर कधी दारुतून गिऱ्हाईकांना फसवून ड्रग देतात. बऱ्याचदा ‘मजा येते म्हणून स्वत: गिऱ्हाइकच वेश्येचे अनुकरण करून ड्रग्ज घेतात. या कुंणखाण्यातील ८०% वेश्या व ६०% गिऱ्हाईक हे MD ड्रग्जच्या अधिन झाले असल्याचे देखील त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

विशेष म्हणजे कुंटणखाना चालकांना देहविक्री व्यवसायापेक्षा MD ड्रग्जच्या व्यापारातून मोठा पैसा मिळत आहे. या वेश्यालयांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून ड्रग्जचा बेसुमार वापर वाढलेला आहे. दुसऱ्या बाजूला या कुंटणखाण्यात बांगलादेशी मुलींची संख्या फार मोठी आहे. बांगलादेशातून अवैध मार्गाने आणलेल्या मुलींना अक्षरशः कुंटणखाण्यात विकले जाते. शेळी-मेंढीची जशी विक्री होते तशी विक्री या मुलींची केली जात असल्याचा खळबळजनक खुलासा त्यांनी या पत्राव्दारे केला आहे.
मडामे यांनी पत्रात म्हटले आहे की, जबरदस्तीने आणलेल्या या बांगलादेशी मुली दलाल व कुंटणखानाचालकाच्या दबावाखाली गिऱ्हाईकाला ‘पागल’ करण्यासाठी वाट्टेल त्या थराला जातात. संबंधित प्रकरणामध्ये या मुलींनी मयत गिऱ्हाईकाला ड्रग्ज दिले. ड्रग्ज घेतल्यानंतर लिंग ताठर होत नाही. लिंग ताठर होण्यासाठी व्हायग्रा / सुहाग्रा अशा गोळ्या खायला दिल्या. या गोळ्यांमुळे हृदयातून जाणारा रक्त प्रवाह वाढू लागतो. परिणामी हृदयविकाराचा झटका येवून मनुष्य गतप्राण होतो. या प्रकरणामध्ये नेमके तेच झाले आहे.

मडामे यांनी पुढे लिहीले आहे की, शिवाय असे मृत्यू कुंटणखाण्यात यापूर्वी झाले आहेत. परंतु त्याची कुठे फार वाच्यता झालेली नाही. दुर्दैवाने आपल्या सरकारी यंत्रणेसोबत या कुंटणखाना चालकांचे गलेलठ्ठ अर्थपूर्ण संबंध बाहेत. त्यामुळे या कुंटणखान्यात ड्रग्जचा व्यापार उदंडपणे चालू असून अवैध बांगलादेशीच्या माध्यमातून वेश्या व्यवसायातून तो अधिक वाढतच चालला आहे.

हे सुद्धा वाचा 
मराठा आरक्षणाचा पेच : एकनाथ शिंदेंनी बोलविली १६ पक्षांची  बैठक, आज निर्णय अपेक्षित
IND vs PAK, Asia Cup 2023: विराट कोहलीची विराट शतकी खेळी; सर्वाधिक वेगाने 13 हजार धावांचा विक्रम
‘बार्टी’च्या महिला अधिकाऱ्याविरोधात मुंडण आंदोलन करुन संताप व्यक्त

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याकडे पोलीस यंत्रणा डोळेझाक करत आहे. गडामे यांनी पोलीसांच्या कार्यपध्दतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, त्यांनी पत्रातून पोलीस यंत्रणेवर आरोप करताना म्हटले आहे की, सोन्याची अंडी देणारी कोंबडी कापण्याची आपल्या पोलीस यंत्रणेची तयारी नाही. परंतु त्यामुळे सामान्य मराठी माणसे व गुजराती व्यापारी ड्रग्ज व व्येश्यागमन अशा दुहेरी दुष्टचक्रात अडकले आहेत. दररोज त्यांची संख्या वाढत चालली आहे.

पोलीस आयुक्तांना लिहीलेल्या पत्रात मडामे यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंधरपड्यापूर्वी आमची बैठक घेतली होती, त्यांनी ‘ड्रग्जमुक्त मुंबई करा’ अशी स्पष्ट सूचना आम्हास दिली आहे. त्यांच्या या सुचनेनुसार आम्ही कामास लागलेला होतो. अशातच हे गंभीर मृत्यूप्रकरण समोर आले आहे. याबाबत मी स्वत: डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय घोरपडे यांना दोन दिवसांपासून संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु त्यांच्याकडून आम्हास कसलीच माहिती दिली जात नाही. त्यामुळे मी कंटाळून आपणांस हे तातडीचे पत्र पाठवित आहे. कृपया डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याअंतर्गत झालेल्या या गंभीर विषयावर आपण ठोस कारवाई करावी, कुंठणखाण्यातील ड्रग्ज पुरवठादारांवर कारवाई करावी,तसेच मुख्यमंत्र्यांनी आम्हास केलेल्या सुचनानुसार ‘ड्रग्ज मुक्त मुंबई’ या मोहिमेस सहकार्य करावे, असे मडामे यांनी पोलीस आयुक्तांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.
तसेच या पत्राची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त आणि सामाजिक न्याय व व्यसनमुक्ती विभागाच्या सचिवांना पाठविली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी