29 C
Mumbai
Tuesday, March 26, 2024
Homeक्राईमकोल्हापूर येथील संपत्तीच्या वादातून तरुणांची मुंबईत हत्या.मामे भावाने केली हत्या.

कोल्हापूर येथील संपत्तीच्या वादातून तरुणांची मुंबईत हत्या.मामे भावाने केली हत्या.

विशाल कांबळे यांची कोल्हापूर येथे मोठी जमीन आणि प्रशस्थ बंगला आहे.ही संपत्ती आपल्या नावावर करावी म्हणून त्याचा मामे भाऊ प्रणव रामटेके हा त्याच्या मागे लागला होता.मात्र, विशाल ने नकार देतात विशाल याला ठार मारण्यात आलं आणि त्याचा मृत्यदेह बडोदा हायवेवर टाकण्यात आला होता.

विशाल कांबळे वय 44 वर्ष आणि त्याची आई रोहिणी कांबळे वय 80 वर्ष हे दोघे ही मूळचे कोल्हापूरचे आहेत.त्यांची कोल्हापूर येथे 5 एकर जमीन आणि मोठा बंगला आहे.ही मालमत्ता काही कोटी रुपयांची आहे.या संपत्ती वरून रोहिणी कांबळे आणि तिचा भाऊ प्रदीप याचा मुलगा प्रणव रामटेके यांच्यात वाद आहे.प्रकरण न्यायालयात आहे. सिव्हिल सूट दाखल करण्यात आला आहे.

ही मालमत्ता आपल्या नावावर करावी , अस प्राण याच म्हणणं होतं.मात्र,त्यास रोहिणी आणि विशालचा विरोध होता.यामुळे प्रणवणे आपल्या काही साथीदारांसह धमकावून विशाल यांच्या कडून मालमत्ता लिहून घेण्याचा कट रचला. रोहिणी आणि विशाल हे जेव्हा कोर्टाच्या कामा निमित्त मुंबईत येतात तेव्हा चेंबूर येथील एका हॉटेलात राहतात.यावेळी ही ते कामा निमित्त आले होते.यावेळी प्रणव आणि त्याच्या सहकार्यानी त्याच अपहरण केलं.यावेळी दोघाना वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आलं.दोघांना गुंगीची औषध देण्यात आलीत. यावेळी रोहिणी हिला गुंगी येण्यापूर्वी तिच्या कडून कोऱ्या स्टॅम्प पेपर वर सह्या आणि अंगठे घेतलेत.

विशाल कांबळे याला ही गुंगीच औषध देण्यात आलं होतं.त्याला आरे कॉलनी येथे नेण्यात आलं.विशाल ला डोस जास्त झाला.त्याला शुद्ध येतच नव्हती.काही वेळाने त्याचा मृत्यू झाला. यामुळे मग प्रणव आणि त्याच्या साथीदारांनी त्याला गुजरातच्या दिशेने नेलं.आणि बडोदा हायवेवरच्या झुडपात त्याच प्रेत फेकून दिलं. याबाबत गुन्हा दाखल झाल्यावर आता विशाल याच कुजलेल्या अवस्थेतील प्रेत पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.त्याच डीएनए तपास ही केला जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

अजित पवार यांची पहिली प्रतिक्रीया; शरद पवारांच्या निर्णयावर काय म्हणाले ?

शरद पवार यांचा निवृत्तीचा निर्णय मागे; पक्षाध्यक्षपदी कायम राहणार

सीबीआयने जीएसटी अधिक्षकावर 25 लाख लाच मागितल्याचा केला गुन्हा दाखल

या प्रकरणात चेंबूर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.प्रणव रामटेके , ज्योती वाघमारे , अनिल उधाने उर्फ मुसा पारकर आणि मुनीर पठाण यांना अटक करण्यात आली आहे.ज्योती हिने विशाल आणि त्याच्या आईला गुंगीच औषध दिल होतं.यामुळे तिला अटक करण्यात आली आहे.या चार जनांवर अपहरण करणे ,धमक्या देणे
आणि हत्या करणे अशा स्वरूपाची कलम लावण्यात आली असून पुढील तपास चेंबूर पोलीस करत आहेत.

Youth killed in Mumbai due to property dispute in Kolhapur. Murdered by uncle’s brother.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी