28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रजिल्हा परिषदेच्या शाळेतील पोषण आहार बंद; चिमुकल्यांची होतेय उपासमार!

जिल्हा परिषदेच्या शाळेतील पोषण आहार बंद; चिमुकल्यांची होतेय उपासमार!

आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरलेली केंद्र शासनाची शालेय पोषण आहार योजना राज्य शासनाच्या व शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे गेली काही महिने बंद पडली आहे. यामुळे गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

शासनाकडून शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना तांदूळाची खिचडी दिली जाते. मात्र, सध्या अनेक शाळांचा तांदूळच संपल्याने मुलांवर उपासमारीची वेळ आली आहे. पोषण आहार विभागातून शिक्षण संचालकांकडे दोन वेळा पत्रव्यवहार करूनही फेब्रुवारी अर्धा संपला, तरीही अद्यापि नवीन तांदूळ वाटप आदेश झालेले नाहीत. पाचवी ते आठवीपर्यंतच्या मुलांना शाळेत तांदूळ खिचडीचा पोषण आहार दिला जातो. जिल्ह्यात साधारणतः 4 लाख 79 हजार विद्यार्थी हे पोषण आहाराचे लाभार्थी आहेत. या मुलांसाठी दर दोन महिन्यांचा तांदूळाचा कोठा शाळांना वाटप केला जातो. यापूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचा कोटा शाळांना प्राप्त झालेला होता. परंतु गेल्या महिन्यापासून पोषण आहार पुरवठा बंद झाल्याने विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित आहे. (Nutrition Stopped At Zilla Parishad school)

ग्रामीण, दुर्गम आदिवासी भागातील अनेक मुले दुपारच्या जेवणाचा डबा सोबत घेऊन येत नाहीत. रोजगारासाठी हंगामी स्थलांतर करणारे पालकांचे काही प्रमाणात आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होते. लॉकडाउन व त्यानंतर दीड-दोन वर्षे शाळा बंद होत्या. या काळात शिजवलेले अन्न न मिळाल्याने अनेक गरीब घरांमधल्या मुलांचे कुपोषण वाढले आहे, असे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत. शिजवलेल्या अन्नाऐवजी राज्यात कोरडा शिधा देणे सुरू झाले. मात्र शाळेत असताना सततच्या लागणाऱ्या पुरवठ्याकडे लक्ष न दिल्याने विद्यार्थ्यांची देखील परवड होत आहे. शाळेतील मध्यान्ह भोजन तयार करण्यासाठी साहित्यच उपलब्ध नसल्याकारणाने या चिमुरड्यांची उपासमार होत आहे.

भारतीय अन्न महामंडळाकडून तांदूळ निःशुल्क देण्यात येतो. पण गेल्या महिन्यापासून तांदूळच आला नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. शालेय पोषण आहार पुरवठ्याचे काम महिला बचत गटांना देण्यात यावे, असे न्यायालयाचे आदेश असताना, जुन्याच कंत्राटदाराकडे पुरवठा करण्याचे काम आहे. पूर्वी कोरोना व आता आढावा घेण्यात येत असल्याचे कारण महिला व बाल विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी देत आहे. त्यामुळे नवीन निविदा काढण्यात आल्या नसल्याचे गेल्या काही दिवसांपासून पोषण आहारवाटप विस्कळीत झाले आहे.

कार्यदिवसांप्रमाणे पहिली ते पाचवीपर्यंत प्रतिविद्यार्थी 100 ग्रॅम आणि सहावी ते आठवीपर्यंत 150 ग्रॅमप्रमाणे तांदूळ शिजविला जातो. मात्र जानेवारी संपल्यानंतर अनेक शाळांमधील हा तांदूळ संपला आहे. त्यामुळे फेब्रुवारी अणि मार्च या दोन महिन्यांचा तांदूळ कोठा मिळावा, अशी मुख्याध्यापकांची मागणी आहे. मात्र, फेब्रुवारी निम्मा उलटला, तरीही अद्यापि अनेक शाळांमध्ये नवीन तांदूळ पोहचलेला नाही. त्यामुळे ‘त्या’ शाळांमध्ये खिचडी शिजणे बंद झाले आहे. परिणामी, मुलांना शाळेत मिळणारा पोषण आहार थांबल्याने पालकांमधूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा:

Budget 2023 : गुड न्यूज… देशात 740 एकलव्य शाळा अन् 38,800 शिक्षकांची भरती!

काय म्हणता ! जिल्हा परिषदेच्या शाळेत फक्त एकच विद्यार्थी…

Caste Certificate : शाळा, विद्यालयांमध्ये मिळणार जात वैधता प्रमाणपत्र

झेडपी दखल घेईना!
डिसेंबर, जानेवारीचा तांदूळ मिळाला होता. मात्र, पारनेर, नेवासा, श्रीरामपूरच्या 25 शाळांनी तांदूळ संपल्याचा अहवाल झेडपीत पाठविला आहे. अन्य तालुक्यांतूनही माहिती संकलित केली जात आहे. तूर्त फेब्रुवारी-मार्चचा तांदूळ वाटप आदेश आलेला नाही. त्यामुळेच पुन्हा एकदा नगरमधून पुण्याला स्मरणपत्र पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी