29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeआरोग्यMahavikas Aghadi : उद्धव ठाकरे, अजितदादा, राजेश टोपे यांचा मोठा निर्णय, जगात...

Mahavikas Aghadi : उद्धव ठाकरे, अजितदादा, राजेश टोपे यांचा मोठा निर्णय, जगात पहिल्यांदाच महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला मिळणार ‘ही’ सुविधा

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’ व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ( Mahavikas Aghadi ) राज्य सरकारने अतिशय महत्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र सरकार हे जगातील पहिलेच सरकार ठरले असल्याचे सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

Mahavikas Aghadi

‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’चा लाभ आता महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला मिळू शकणार आहे. यापूर्वी पिवळ्या व केसरी रेशनिंग कार्डधारकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. आता तो पांढऱ्या कार्डधारकांनाही मिळणार आहे. या निर्णयामुळे कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे.

या योजनेत तब्बल 1200 आजारांचा समावेश आहे. राज्य सरकारने ( Mahavikas Aghadi ) सूचित केलेल्या निवडक 1000 रूग्णालयांमध्ये भरती होणाऱ्या प्रत्येक रूग्णाला पूर्णपणे मोफत उपचार दिले जाणार आहेत. आपल्या राज्यातील नागरिकांना इतका मोठा लाभ देणारे जगात कोणतेही राज्य नाही. महाराष्ट्र हे जगातील पहिले राज्य ठरले आहे.

ही बातमी सुद्धा वाचलीच पाहीजे : Ajit Pawar …अन् अजितदादांनी ‘त्या’ फाईलवर एका मिनिटात, तर मुख्यमंत्र्यांनी दहा मिनिटांत सही केली

‘कोरोना’ची परिस्थिती बिकट झाली आहे. लोकांकडे उपचारासाठी पैसे नाहीत. खासगी रूग्णालये रूग्णांची पिळवणूक करीत आहेत. त्यामुळे नागरिकांची बिकट स्थिती लक्षात घेऊन ( Mahavikas Aghadi ) सरकारने हा निर्णय घेतला आहे.

ही मोफत सुविधा  31 जुलैपर्यंत लागू राहणार आहे. परंतु ‘कोरोना’ची परिस्थिती नियंत्रणात आली नाही, तर त्याला आणखी मुदतवाढ दिली जाऊ शकते असे ( Mahavikas Aghadi ) सूत्रांनी सांगितले.

असा निर्णय घेण्याबाबत पहिला विचार आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या मनात आला. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा यांना या याबाबत माहिती दिली. ठाकरे व अजितदादांनी त्यास संमती दर्शवून तात्काळ प्रस्ताव पाठविण्यास सांगितले.

ही बातमी सुद्धा वाचलीच पाहीजे : मंत्रालयातील IAS अधिकारी टेबल साफ करतात, चहाचे कपही धुतात

त्यानुसार राज्य आरोग्य सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी हा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावावर आरोग्य सचिव, राजेश टोपे यांच्या स्वाक्षरी झाल्या. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडणार आहे. परंतु लोकांच्या हिताची ही योजना असल्यामुळे अजितदादांनी चक्क एका मिनिटातच फाईलवर स्वाक्षरी केली.

ही बातमी टाईप करीत असताना प्रस्तावाची फाईल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर होती. थोड्या वेळातच किंवा सकाळपर्यंत ठाकरे यांची फाईलवर स्वाक्षरी होईल. त्यानंतर उद्या त्याबाबतचा आदेश (जीआर) जारी होईल असे सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊँट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

CET Result : आदित्य ठाकरेंच्या सुचनेमुळे सीईटीचा निकाल उद्या जाहीर होणार

Coronavirus : उद्धव ठाकरे, राजेश टोपेंचे धडाकेबाज पाऊल; राज्यातील सगळी खासगी रूग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश जारी, मेस्मा कायदाही लागू

अजितदादांनी भाजपला फटकारले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी