30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रसत्ता हातातून जात असताना 'महाविकास आघाडी' सुस्तचं

सत्ता हातातून जात असताना ‘महाविकास आघाडी’ सुस्तचं

टीम लय भारी

मुंबई : महाविकास आघाडी सरकार हे आतापर्यंत सर्वाधिक चर्चेत राहिलेले सरकार आहे. या सरकारच्या सत्तेत अनेक नाट्यमय असे किस्से देखील घडलेले आहेत. आता सुरु असलेली सत्ता पालटाची मालिका देखील नवनवीन वळण घेत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे गेल्या दोन महिन्यांपासून विरोधकांच्या संपर्कात होते. तरी देखील याची साधी भनकही महाविकास आघाडी सरकारला लागू शकली नाही.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत एकूण ४५ ते ५० आमदार असल्याचा ठोस दावा केला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या गटातील प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी संध्याकाळ पर्यंत ५० आमदार सोबत असतील, असा आत्मविश्वास दाखविला आहे. त्यामुळे सत्तेत असलेल्या नेत्यांचे आणि पक्षश्रेष्ठींचे धाबे दणाणले आहेत.

हातात असलेल्या सत्तेच्या गर्वात राहून महाविकास आघाडी सरकारने कायमच छोट्या पक्षांना आणि काही आमदारांना खालची वागणूक दिली. सत्तेच्या सिंहासनावर जरी शिवसेनेचे उद्धव ठाकरे असले तरी त्याचा रिमोट मात्र कायम राष्ट्रवादीच्या हातात पाहायला मिळाला. त्यामुळे शिवसेनाच नाही तर मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसमधील बरेचसे आमदार पण या सत्तेत राहून कायमच नाराज असल्याचे पाहावयास मिळाले.

महाविकास आघाडीमध्ये गेल्या बऱ्याच दिवसापासून अंतर्गत कलह सुरु असल्याची माहिती समोर येत होती. पण कायमच यावर कोणता ना कोणता मुद्दा उपस्थित करून पडदा टाकण्याचे काम केले जात होते. बहुतेक वेळा तर काँग्रेसचे नाना पटोले हेच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आपले मत व्यक्त करताना दिसून आले. त्यामुळे कायमच काँग्रेस पक्ष हा सत्तेत असून देखील खुश नसल्याचे समोर येत होते.

पण आता सत्ता हातातून जात असताना पण महाविकास आघाडी अद्यापही सुस्तावलेली असल्याचेच दिसून येत आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तर हा पूर्णतः शिवसेना पक्षाचा मुद्दा असल्याचे म्हणत यामधून आपले हात झटकले आहेत. पण राष्ट्रवादी पक्षातील आमदारांनी अशी बंडखोरी करू नये यासाठी हवी तितकी खबरदारी घेतलेली नाही. सोबतच काँग्रेस पक्षाचे काही आमदार देखील फुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आलेली आहे. पण त्याबाबत काँग्रेस पक्ष देखील ठोस पावले उचलण्याच्या तयारीत असल्याचे अद्याप तरी दिसून आलेले नाही.

एकंदरीतच, आता महाविकास आघाडी देखील सत्ता हातातून गेल्याचे गृहीत धरूनच आपली भूमिका स्पष्ट करेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

हे सुद्धा वाचा :

सेनेच्या नव्या गटनेत्याला बंडखोर आमदारांचा विरोध

भाजपचे नेते ‘बांधणी‘ करत होते; तेव्हा महाविकास आघाडीचे नेते ‘झोपा‘ काढत होते !

एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद हवे होतेमहाविकास आघाडी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी