29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराष्ट्रीयचंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तूरा

चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तूरा

टीम लय भारी

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्यातील वकील दीपक चटप हे ब्रिटिश सरकारच्या चव्हनींग ग्लोबल लीडर शिष्यवृत्तीचे मानकरी ठरलेत. त्यांना 45 लाखांची शिष्यवृत्ती मिळाली. दीपक चटप लवकरच उच्च शिक्षणासाठी लंडनला रवाना होणार आहेत. 24 व्या वर्षी ही शिष्यवृत्ती मिळवणारा देशातील तो सर्वात तरुण वकील आहे.

सामाजिक नेतृत्व करू इच्छिणाऱ्या जगभरातील युवकांना ब्रिटिश सरकार दरवर्षी चव्हनींग ग्लोबल लीडर ही शिष्यवृत्ती देते. चंद्रपूर सारख्या मागास जिल्ह्यातील एका तरुणाने ही शिष्यवृत्ती पटकावून ग्रामीण भागातील बुद्धिमत्तेची चुकून दाखवली आहे.
त्याने संविधानिक नैतिकता हा ऑनलाईन कोर्स तयार करून राज्यातील 1200 विद्यार्थ्यांना संविधान विषयक प्रशिक्षण दिले.

लंडनच्या एसओ ए एस या जगातील सर्वोत्तम विद्यापीठात उच्चशिक्षणासाठी दीपक लवकरच रवाना होणार आहे. दुर्बल घटकांच्या मूलभूत प्रश्नांना कायद्याने वाचा फोडण्याचे विधायक काम तो करत आहे. त्याने प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत व माध्यमिक शिक्षण गडचांदुर येथे पूर्ण केले. पुणे येथील नामांकित आयएलएस विधि महाविद्यालयातून कायद्याची पदविका प्रथम श्रेणीत मिळवली.

वकिलीचं शिक्षण घेताना दीपकने मुंबई येथील अरबी समुद्रातील प्रदूषणाची याचिका राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात दाखल केली. मानवाधिकार आयोगात शेतकरी आत्महत्येविषयक तक्रारी दिल्या. विधीमंडळात अधिवेशन काळात लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून दुर्गम भागातील प्रश्न सभागृहात मांडले. शेती व विधीविषयक चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविला.

चंद्रपूर जिल्ह्यातील कोलाम व माडिया या आदिवासी समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर मानवाधिकार आयोग व उच्च न्यायालयात याचिका दाखल करत न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

हे सुध्दा वाचा : 

भारताला ‘ब्लॅकस्वान‘चा लागू शकतो झटका

मुंबईच्या ‘या’ माजी पोलिस आयुक्तांच्या मागे लागली ईडीची पीडा

आरे वाचवण्यासाठी ठाकरे बंधूंचे एकमत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी