28 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
Homeमुंबईराजकारणाच्या वादळात मराठी अभिनेत्यांनी घेतली उडी

राजकारणाच्या वादळात मराठी अभिनेत्यांनी घेतली उडी

टीम लय भारी

मुंबई : राज्यात सत्ताधारी आणि बंडखोर आमदार यांच्यामध्ये राजकीय युद्ध सुरु आहे. गेल्या ७ दिवसांपासून हे राजकीय नाट्य सुरु आहे. राज्यातील या सत्तानाट्यावर सामान्य माणसापासून ते सर्वच क्षेत्रातील व्यक्ती आपले मत व्यक्त करत आहे. आता या राजकीय संघर्षामध्ये मराठी अभिनेत्यांनी देखील उडी घेतली आहे. मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी त्यांच्या ‘दुसरं वादळ’ या पुस्तकामध्ये एकनाथ शिंदे यांच्या सोबतचा एक किस्सा लिहिला आहे. शरद पोंक्षे आजारी असतानाच किस्सा त्यांनी यावेळी लिहिलेला आहे. याबाबतची पोस्ट त्यांनी २४ जून ला प्रसिद्ध केली.

शरद पोंक्षे यांनी २४ जून ला शेअर केलेल्या पोस्टवरील फोटोमध्ये लिहिले आहे की, ‘हॉस्पिटलमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला. म्हणाले तुम्ही बिल भरायचे नाही. फक्त स्वत:ची काळजी घ्यायची आणि बरं व्हायचं. सख्ख्या भावासारखे ते माझ्यामागे उभे राहिले.’ शरद पोंक्षे यांनी त्यांची ही पोस्ट नेमकी राजकीय सत्तानाट्य सुरु झाल्यावर पोस्ट केल्याने त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, त्यांच्या या पोस्टनंतर मराठीतील अभेनेते, सूत्रसंचालक आणि सेनेचे सदस्य आदेश बांदेकर यांनी शरद पोंक्षे यांना त्यांच्या आजारपणात त्यांच्यासोबत कोण पाठीशी होतं, याची आठवण करून दिली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ आदेश बांदेकर यांनी पोस्ट केला आहे. एका मुलाखती दरम्यान शरद पोंक्षे यांनी त्यांच्या आजारपणात सर्वात प्रथम आदेश बांदेकर हे त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याचे सांगितले आहे. बांदेकर यांनी या व्हिडिओला पोस्ट करत ‘हा शरद पोंक्षे तूच ना?’ असे लिहिले आहे.

पण यानंतर शरद पोंक्षे यांनी सुद्धा याला प्रतिउत्तर दिले आहे. शरद पोंक्षे यांनी ‘दुसरे वादळ’ या पुस्तकाचा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या आजारपणात आदेश बांदेकर यांनी त्यांना कशी साथ दिली याबाबत लिहिले आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी ‘शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही. @aadesh_bandekar’ असे लिहिले आहे.

या पोस्टनंतर मराठी सिनेसृष्टीत सुद्धा राजकीय वातावरण रंगणार अशा चर्चा रंगात. म्हणून आता आदेश बांदेकर आणि शरद पोंक्षे यांच्यातील हे सोशल मीडियावरील वाकयुद्ध किती दिवस चालणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हे सुद्धा वाचा :

उद्धव ठाकरे यांना एका आंबेडकरवाद्याचे पत्र !

लवकरच पेट्रोल 33 रुपयांनी स्वस्त; बिअर 17 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता

आदित्य ठाकरे म्हणाले, 7 वाजल्यानंतर गुलाबराव पाटील थरथरायला लागतात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी