31 C
Mumbai
Tuesday, March 26, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात रंगणार दुसरे मराठी सोशल मीडिया संमेलन

पुण्यात रंगणार दुसरे मराठी सोशल मीडिया संमेलन

टीम लय भारी

मुंबई: नुकतचं अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडले आहे. मराठी लोक आणि त्यांचे साहित्य हे पार महाराष्ट्राच्या बाहेरपर्यंत गेले आहे. कोटींच्या घरात असणारे लोक आणि त्यांचे साहित्य आज आणि उद्यासाठी महत्त्वाचे आहे. आता काळ बदला आहे. तुम्ही आम्ही सगळे सोशल मीडियावर सक्रिय आहोत. तरुणांना ही सोशल मीडिया जवळचा वाटतो. म्हणूनच आता मराठी सोशल मीडियावर (Social Media Convention)  आगळंवेगळं साहित्य संमेलन होऊ घातलं आहे.  Marathi Social Media Convention  

दुसरे मराठी सोशल मीडिया संमेलन (Social Media Convention)  २९ एप्रिल ते १ मे दरम्यान पुण्यात होणार आहे. या तीन दिवसीय संमेलनाची कार्यक्रमपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली. डिजिटल मीडिया प्रेमी मंडळी या संस्थेने या संमेलन आयोजित केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कॅम्पस, गणेशखिंड येथे सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत हे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. संमेलनात सर्वांना विनामूल्य प्रवेश मिळणार आहे. मोफत ऑनलाइन नावनोंदणी www.thesammelan.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून करता येईल.

कार्यक्रमाचे उदघाटन शुक्रवारी (२९ एप्रिल) सकाळी ११ वाजता होणार असून यावेळी सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी उदय सांमत, सतेज पाटील, यशोमती ठाकूर, अदिती तटकरे, विनोद तावडे, गिरीश बापट, सिद्धार्थ शिरोळे, मधुरा बाचल, सूमन धामणे, नितीन करमळकर, एन. एस. उमराणी, राजेश पांडे, डॉ. प्रफुल्ल पवार, सतीश मगर, यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

हे सुद्धा वाचा :

राजापूरमधील बारसू-सोलगाव पंचक्रोशीमध्ये जमीन खरेदीवरून शिवसेना मंत्र्याचा काळा बाजार

95th All India Marathi Literary Conference: Participants demand research centre on ‘vachana’ literature

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी