30 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeमुंबईभारतीयांना परवडणारे तंत्रज्ञान विकसित करुन मारुती-सुझुकीचा ई- वाहनांची निर्मिती करण्याकडे कल

भारतीयांना परवडणारे तंत्रज्ञान विकसित करुन मारुती-सुझुकीचा ई- वाहनांची निर्मिती करण्याकडे कल

टिम लय भारी

मुंबई : मारुती-सुझुकी (Maruti-Suzuki) ही केवळ गाड्यांची विक्रीच करीत नाही. तर, ग्राहकांचे समाधान करण्यावर अधिक भर देत असते. त्यामुळेच गेल्या चार वर्षांमध्ये मारुती-सुझुकीच्या गाड्यांच्या विक्रीचा दर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. गेल्या वर्षात मुंबई विभागामध्ये सुमारे १ लाख २६ हजार गाड्यांची विक्री करण्यात आलेली आहे.अशी माहिती मारुती-सुझुकीचे वरिष्ठ संचालक शशांक श्रीवास्तव यांनी दिली. (Maruti-Suzuki had a large number of sales)

त्यामुळे सामान्य भारतीयांना परवडणारे तंत्रज्ञान विकसीत करुन त्याआधारे ई- वाहनांची निर्मिती करण्यावर विचार सुरु आहे; तसेच त्या दृष्टीने प्रयत्नही सुरु आहेत, असे मारुती-सुझुकीचे (Maruti-Suzuki) वरिष्ठ संचालक शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले. वाहनांच्या हस्तांतरणाचा वेग कमी आहे, याबाबत ते म्हणाले की, तांत्रिक अडचणींमुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. ही समस्या केवळ भारतामध्येच नाही तर सबंध जगभर आहे. ही समस्याही लवकरच मार्गी लागणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Maruti Suzuki (@marutisuzukiofficial)

गेल्या एका वर्षात मुंबई-ठाणे विभागामध्ये सुमारे सव्वा लाख गाड्यांची विक्री झाली आहे. त्यामध्ये मारुती-सुझुकीच्या (Maruti-Suzuki) ५५ हजार गाड्यांचा समावेश आहे. त्यावरुन मारुती उद्योग समुहाला नागरिकांची सर्वाधिक पसंती मिळत असल्याचेच स्पष्ट होत आहे. मारुती-सुझुकीच्या ‘वेलॉक्स’ या वागळे इस्टेट येथील नवीन शो रुमचे उद्घाटन मारुती-सुझुकीचे वरिष्ठ संचालक शशांक श्रीवास्तव, नोबुताका सुझुकी यांच्या हस्ते तसेच गृहनिर्माण व अल्पसंख्यांक मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड, ॠता आव्हाड, दिग्वीजय गर्जे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले. त्यावेळी श्रीवास्तव बोलत होते.

मारुती-सुझुकीवर (Maruti-Suzuki) लोकांचा प्रचंड विश्वास आहे. हा विश्वास वृद्धीगंत व्हावा, यासाठी आमचा प्रयत्न आहे. इंधन दरवाढीचा वेग हा वाहन उद्योगासाठी नकारात्मक असतो, यामध्ये कोणाचेही दुमत असण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे लोकांचा कल सीएनजी वाहने खरेदी करण्याकडे अधिक आहे.

हे सुध्दा वाचा :- 

Auto Sales April 2022: Maruti Suzuki Records 10.21 Per Cent Sales Decline In Domestic PV Sales

भाजपा राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा दोन वर्षापासून प्रयत्न करत आहे : नाना पटोले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी