33 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeराजकीयमध्यावधी निवडणुकांची काॅंग्रेसला भरली ‘धडकी‘ ; राष्ट्रवादी काॅंग्रेसची ‘नो कमेंटस‘

मध्यावधी निवडणुकांची काॅंग्रेसला भरली ‘धडकी‘ ; राष्ट्रवादी काॅंग्रेसची ‘नो कमेंटस‘

टीम लय भारी

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठं ‘भगदाड‘ पडले. हे भगदाड कसे भरुन काढायचे, हा प्रश्न उभा राहिला आहे. मात्र यावर पर्याय म्हणून मध्यावधी निवडणूका नको अशी भूमिका काॅंग्रेस घेतली आहे. तर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे मोठे नेत्यांनी ‘नो कमेंटस‘ची भूमिका घेतली आहे.

आज काॅंग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. त्यावेळी मध्यवर्ती निवडणूक नको अशी भूमिका काॅंग्रेसच्या नेत्यांनी घेतली. काही वर्षांपासून राज्यात काॅंग्रेसला उतरती कळा लागली आहे. काॅंग्रेस राजकीय घडी विस्कळीत झाली आहे. जुन्या फळीतल्या नेत्याइतके नव्या पिढीतले नेते सक्षम नाही. शिवाय राहूल गांधी राज्यातील काॅंग्रेसच्या नेत्यांकडे जातीने लक्ष देत नाहीत. त्यामुळे ही निवडणूक काॅंग्रेसला न परवडणारी अशी आहे.

काॅंग्रेसला पूर्ण पणे संपवायचे ही भाजपची महत्वाकांक्षा आहे. त्यामुळे काॅंग्रेसच्या नेत्यांना निवडणुका नको. केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून राज्यात भाजपने चांगलीच मुसंडी मारली आहे. त्यामुळे जर पुन्हा मध्यवधी निवडणूका झाल्या तर रा. काॅंग्रेसला देखील न परवडणारे आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या मोठया नेत्यांनी भाष्य करणे टाळले आहे. कालपासून त्यांची ‘वेट आणि वाॅच‘ ची भूमिका राहिली आहे. आता सर्वांना उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस अध्यक्ष शरद पवार नेमकी कोणती भूमीका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. अजित पवार यांनी देखील कालपासून या विषयावर कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही.

हे सुद्धा वाचा :

शिवसेनेत सतत कारस्थाने करणाऱ्या शंभूराज देसाईंना पक्षाची नोटीस

नितीन देशमुख म्हणाले, गुजरात पोलिसांनी मला हात – पाय धरून गाडीत कोंबले, एकनाथ शिंदेंनी फसविले

एकनाथ शिंदेंनी सांगितले, नितीन देशमुखांना पळविल्याचे कारण

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी