29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रभूकंपाने हादरले मुळशी 

भूकंपाने हादरले मुळशी 

टीम लय भारी

पुणे: पुण्याच्या मुळशी तालुक्यामध्ये असलेल्या मौजे निंबाळवाडी आणि मौजे वडगाव वाघवाडी भागात भूकंपाचे सौम्य धक्के बसले. या धक्क्यामुळे 500 मीटरपर्यंत जमीनला भेगा पडल्या आहेत. या दोन्ही गावात असलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. हे दोन्ही गावं मुळशीतील डोंगराळ परिसरात आहेत. यंदा जास्त पाऊस झाल्याने मुळशीतील अनेक गावांना फटका बसला आहे. त्यात आता भुकंपाचा धक्का बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भुस्खलनासारखी स्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांची योग्य काळजी घेतली जात आहे.

पुणे जिल्ह्यात यंदा भरपूर पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. भाटघर धरण आणि नीरा देवघर धरण या दोन्ही धरणात पुरेसा पाणीसाठा झाला आहे. मोठया धरणाचा जमिनीवर पडणारा ताण, खाण काम, मोठया रस्त्याचा कामासाठी सुरुंग लावणं इत्यादी कारणांमुळे भूकंप होत असतात.पुणे जिल्हा प्रशासनाने मुळशी तालुक्यातील गुटके गावातील 14 कुटुंबांना दरड कोसळण्यापासून बचावाचा उपाय म्हणून खोऱ्यातील मोकळ्या जमिनीवर बांधलेल्या तात्पुरत्या निवासी इमारतींमध्ये स्थलांतरित केले आहे. वस्तीच्या अगदी वरच्या जागेत मोठ्या जागेवर एक फूट सरकत असल्याचे गेल्या वर्षी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.

हे सुध्दा वाचा:

पाहा: कुठे…कुठे ’आग’ धुमसतेय

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ‘रविकांत वरपे’ यांनी दिले ‘रामदास कदमां’ना सडेतोड उत्तर

‘मी पुन्हा येईन’ या मराठी वेब सीरिजच्या टीझरवर भडकले बाबासाहेब पाटील

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी