एज्युकेशन

फक्त एक रुपयात मिनी एमबीएचे प्रशिक्षण, मराठी तरुणांसाठी उद्यमी महाराष्ट्राचा अनोखा उपक्रम

व्यवसायाची आवड असणाऱ्यांसाठी, व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी उद्यमी महाराष्ट्र फक्त एक रुपयात जगभरातील मराठी तरुणांना मिनी एमबीएचे प्रशिक्षण देणार आहे. सोमवार १६ मेपासून या प्रशिक्षणास सुरुवात होत असून ११ दिवसांचे हे प्रशिक्षण असणार आहे.

टीम लय भारी

ठाणे : व्यवसायाची आवड असणाऱ्यांसाठी, व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी उद्यमी महाराष्ट्र फक्त एक रुपयात जगभरातील मराठी तरुणांना मिनी एमबीएचे प्रशिक्षण देणार आहे. सोमवार १६ मेपासून या प्रशिक्षणास सुरुवात होत असून ११ दिवसांचे हे प्रशिक्षण असणार आहे. ११ दिवसांचे प्रशिक्षण (Mini MBA) पूर्ण करणाऱ्या निवडक मराठी तरुणांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी उद्यमी महाराष्ट्र आर्थिक पाठबळ देखील देणार आहे.(Mini MBA training for just one rupee)

फक्त एक रुपयात मिनी एमबीएचे प्रशिक्षण, मराठी तरुणांसाठी उद्यमी महाराष्ट्राचा अनोखा उपक्रम

एमबीएमध्ये (Mini MBA) जे शिकवले जाते त्याचा उपयोग व्यवसायासाठी कसा करावा याची माहिती मराठी तरुणांना मिळत नाही. त्यामुळे आर्थिक किंवा इतर तत्सम अडचणीमुळे व्यवसाय करण्याचे धाडस ते करत नाही, त्या सर्वांसाठी हा अनोखा उपक्रम उद्यमी महाराष्ट्रने हाती घेतला असल्याचे डॉ. माळी यांनी सांगितले. सायंकाळी ८.३० ते १०.३० या वेळेत अकरा दिवस लाईव्ह मिनी एमबीएचे सत्र होणार आहे. उद्यमी महाराष्ट्राच्या व्यासपिठावर हजारो तरुणांना इम्पोर्ट एक्सपोर्टचे प्रशिक्षण देण्यात आले असून दोन वर्षात दहा हजार मराठी तरुणांनी उद्यमी महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ओमकार हरी हरी माळी यांच्यासोबत स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

मराठी तरुणांसाठी कार्यरत असणारे उद्यमी महाराष्ट्र आता अनोखा उपक्रम घेऊन आले आहे ते म्हणजे फक्त एक रुपयात एमबीएचे प्रॅक्टिकल प्रशिक्षण (Mini MBA) दिले जाणार आहे. शेवटच्या दिवशी हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्येकाला प्रत्यक्ष भेटून ते व्यवसायविषयक मोफत मार्गदर्शन देखील करणार आहेत. त्यानंतर लकी ड्रॉच्या माध्यमातून ११ जणांचा ग्रुप तयार करून त्या ११ जणांना त्यांचा व्यवसाय उभा करण्यासाठी आर्थिक पाठबळ देखील दिले जाणार आहे.

हे सुद्धा वाचा :- 

Karnataka News Live Updates: 50k in state get Covid compensation; 29k make claims now

रंगरंगोटीच्या पलिकडे मुंबई महानगरपालिका काहीच करताना दिसत नाही : नितेश राणे

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close