28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमंत्रालयमंत्रालय प्रवेश आता सर्वांसाठी खुला

मंत्रालय प्रवेश आता सर्वांसाठी खुला

टीम लय भारी

मुंबई:  दलाल, आमदार, राजकीय पक्षाच्या कार्यकर्तांना वशिलेबाजीच्या जोरावर कोरोना काळात मंत्रालयात प्रवेश मिळत होता. परंतू रंजल्या गांजलेल्या जनतेला मंत्रालयाची पायरी देखील चढू दिली जात नव्हती. मात्र राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध गुढीपाडव्यापासून मागे घेण्यात आले आहे. मंत्रालय आता सर्व सामान्य जनतेसाठी खुले होणार आहे.

कोरोना’चे सगळे निर्बंध उठताच जितेंद्र आव्हाडांनी भाजपला हाणला टोमणा !

राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे आता गुढी पाडवा, रमजान, राम नवमी असे सण साजरे करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

१ एप्रिल ते ८ एप्रिलपर्यंत राज्य सरकारने संचारबंदी लागू केली होती. या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा, रामनवनी हे सण कसे साजरे करायचे? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता. भाजपने यासंदर्भात राज्य सरकारवर सातत्याने टीका केली होती.यानंतर आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर हे सण मोठ्या उत्साहात साजरे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यासंदर्भात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. केंद्राच्या निर्णयानुसार मास्कसक्ती आणि सोशल डिस्टन्सिंग कायम असेल.

आव्हाड यांनी म्हटलं की, ज्यांना वाटत असेल त्यांनी मास्क लावावा, ज्यांना वाटत असेल मास्क लावू नये, त्यांनी लावू नये. आता कोणतंही बंधन राज्यात राहिलेलं नाही”, उद्यापासून राज्यातील सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत.

हे सुध्दा वाचा: 

शरद पवार – उद्धव ठाकरे यांच्यात मंथन, पाच राज्यांच्या निकालानंतर तातडीची बैठक

केंद्रीय तपास यंत्रणेच्या विळख्यात ठाकरे सरकार वाचविणार तरी कोणा कोणाला?

महिला पत्रकार राणा अयुब यांना मुंबई विमानतळावर का रोखलं?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी