29 C
Mumbai
Friday, August 4, 2023
घरमंत्रालयअठरा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; महसूल आणि वन विभागाच्या प्रधान सचिवपदी सोनिया सेठी

अठरा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; महसूल आणि वन विभागाच्या प्रधान सचिवपदी सोनिया सेठी

राज्य सरकारने अठरा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात महसूल आणि वन विभागाच्या प्रधान सचिवपदी (मंत्रालय) सोनिया सेठी (1994 बॅच ) यांची बदली झाली आहे. गेल्या दोन महिन्यात तब्बल 80 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या सरकारने केलेल्या आहेत. रुपिंदर सिंग (1996 बॅच ) यांची बदली नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्तपदी आणि प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली आहे. गोरख गडीलकर (2003 बॅच ) यांची अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, वर्धा येथून रेशीम कीडपालन विभाग नागपूर, संचालकपदी बदली झाली आहे.

प्रकाश खापले (२०१३ बॅच )अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, नांदेड यांची बदली सहव्यवस्थापकीय संचालक महाडिसकॉम, औरंगाबाद, औरंगाबाद विभागीय अतिरिक्त आयुक्त अविनाश पाठक (२०१३ बॅच )यांची बदली बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी करण्यात आली आहे. अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती,जळगाव गुलाब खरात (२०१३ बॅच ) यांची बदली शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे. अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, पुणे प्रवीणकुमार देवरे (२०१३ बॅच ) यांची संचालक ओबीसी बहुजन कल्याण, पुणे येथ झाली आहे. अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, गडचिरोली मिलिंदकुमार साळवे (२०१३ बॅच ) यांची बदली सहआयुक्त राज्य कर, औरंगाबाद येथे झाली आहे. नवी मुंबई सिडकोचे वरिष्ठ जमीन सर्वेक्षण अधिकारी
सतिशकुमार खडसे (२०१४ बॅच) यांची बदली महानगरीय क्षेत्र आयुक्त नाशिक मेट्रो रिजन डेव्हलपमेन्ट अथॉरिटी, नाशिक येथे करण्यात आली आहे. उपआयुक्त (महसूल) औरंगाबाद विभाग संजय काटकर (२०१४ बॅच ) यांची बदली सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. उपआयुक्त (महसूल) औरंगाबाद विभाग, पराग सोमण (२०१४) यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई महानगरीय क्षेत्र झोपडपट्टी प्राधिकरण, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. २०१४ च्या बॅचचे प्रमोटेड अधिकारी तसेच वसई-विरार महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांना सनदी अधिकारी म्हणून बढती मिळाली आहे. तर आता सनदी अधिकारी म्हणून याच महापालिकेत कार्यरत राहणार आहेत.
हे सुद्धा वाचा
इंडिया आघाडीचे अनेक नेते उपलब्ध नाहीत; मुंबईतली बैठक लांबणीवर पडली
आता राज्यात सर्व सरकारी रुग्णालयात मिळणार मोफत उपचार; मंत्रिमंडळाचा निर्णय
प्रदीप कुरुलकरवर देशद्रोहाचा खटला चालवा- जयंत पाटील यांची मागणी

२०१४ च्या बॅचचे सनदी अधिकारी तसेच सचिन कलतरे यांना सनदी अधिकारी म्हणून बढती मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य बीज महामंडळ, अकोलाचे ते व्यवस्थापकीय संचालक असतील. मनोज रानडे (२०१४ बॅच ) हे कोकण भवनचे उपआयुक्त (सामान्य प्रशासन ) असून त्यांची बदली संचालक महापालिका प्रशासन करण्यात आली आहे. किनवटच्या आयटीडीपी प्रकल्पाचे अधिकारी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांची बदली जवहार पालघर येतील याच विभागात सहाय्यक जिल्हाधिकारी पदी बदली झाली आहे. २०२० चे सनदी अधिकारी आयन मुरूगनानठम हे पूर्वी चंद्रपूरचे आयटीडीपी प्रकल्पाचे अधिकारी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी होते. त्यांची बदली आयटीडीपी प्रकल्पाचे अधिकारी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी गडचिरोली म्हणून बदली करण्यात आली आहे. अमरावती उप विभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी रिचर्ड एन्थन (20२० बॅच) यांची बदली धारणी, अमरावती आयटीडीपी प्रकल्पाचे अधिकारी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. पुसद उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेय एस. (२०२० बॅच ) यांची बदली आयटीडीपी प्रकल्पाचे अधिकारी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, किनवट, नांदेड म्हणून करण्यात आली आहे. कोणतेही नवीन सरकार आल्यावर ते आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांची वर्णी लावण्याचा प्रयत्न करत असतो. गेल्या दोन महिन्यात तर घाऊक पद्धतीने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी