30 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeमंत्रालयCoronavirus : अजितदादांचे आवाहन, मेणबत्ती – दिवे पेटवताना सॅनिटायझरमुळे हात भाजून घेऊ...

Coronavirus : अजितदादांचे आवाहन, मेणबत्ती – दिवे पेटवताना सॅनिटायझरमुळे हात भाजून घेऊ नका

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’चा  ( Coronavirus ) प्रसार टाळण्याच्या अनुषंगाने लोक हाताला सॅनिटायझर लावतात. परंतु सॅनिटायझर लगेच पेट घेत असते. त्यामुळे मेणबत्ती, दिवे व पणती पेटवताना आपले हात भाजणार नाहीत याची काळजी लोकांनी घ्यावी असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रात्री नऊ वाजता दारात, खिडक्यात दिवे लावण्याचं आवाहन केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर अजितदादांनी सावधगिरीच्या सुचना दिल्या आहेत. मेणबत्ती, दिवे पेटविताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. रस्त्यावर उतरुन गर्दी करणे टाळावे. सध्या सॅनिटायझरने हात स्वच्छ केले जातात, अशा वेळी दिव्याजवळ हात नेल्यास अपघात होऊ शकतो. त्याबाबत सावध राहावे असे अजितदादांनी म्हटले आहे.

‘कोरोना’ विषाणूमुळे ( Coronavirus ) संसर्ग वाढत चालला आहे. या आपत्तीमुळे राज्याची अर्थव्यवस्थाही अडचणीत आली आहे. त्यामुळे एका बाजूला कोरोनावर ( Coronavirus ) मात करण्याची गरज आहे, तर दुसऱ्या बाजूला अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे आव्हान आहे. राज्यासमोर ही दोन प्रमुख आव्हाने आहेत. नागरिकांनी आणखी काही दिवस घरातच थांबून ‘कोरोना’ ( Coronavirus ) प्रसार रोखला तर या दोन्ही आव्हानांवर मात करता येईल असाही विश्वास अजितदादांनी व्यक्त केला आहे.

अजितदादा म्हणतात की, राज्यातील कोरोना ( Coronavirus ) रुग्णसंख्येत साडेसहाशेपर्यंत झालेली वाढ थांबवणं, दररोज वाढणारे मृत्यू रोखणं, आरोग्य, पोलिस, अन्य यंत्रणांवरचा ताण कमी करणं, टाळाबंदीनं ठप्प झालेली अर्थव्यवस्था रुळावर आणणे ही आपल्या सर्वांसमोरची प्रमुख आव्हानं आहेत. या आव्हानांवर लवकरात लवकर मात करण्यासाठी नागरिकांनी संयम व शिस्त पाळली पाहिजे. कोरोनाचा ( Coronavirus ) प्रसार पाहता हा विषाणू आपल्या गावात, वस्तीत, सोसायटीत पोहचला आहे. त्याला स्वत:च्या घरात न आणणं, स्वत:ला, कुटुंबाला त्याची लागण होऊ न देणं हे आता तुमचं कर्तव्य आहे. आणखी काही दिवस संयम पाळला आणि घराबाहेर पडणं टाळलं तर कोरोना नक्कीच आटोक्यात येऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात आरोग्य, पोलीस, अन्न व नागरी पुरवठा व सर्वच शासकीय विभागाचे अधिकारी – कर्मचारी ध्येयनिष्ठेने काम करीत आहेत. नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

हे सुद्धा वाचा

Coronavirus : मोदी समर्थकांचा कळस : शिवराय, महात्मा गांधीं, डॉ. आंबेडकरांच्या कार्यासोबत ‘मेणबत्त्या इव्हेन्ट’ची तुलना

Covid2019 : विजेचे दिवे चालू ठेवूनच मेणबत्ती पेटवा : ऊर्जा मंत्र्यांचे आवाहन

MARKAJ : मुस्लिमांचं काय करायचं ? ( संजय आवटे )

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रसारित केलेली माहिती

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी