34 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमंत्रालयहरभरा उत्पादकांना क्विंटलमागे आठशे रुपयांची फरकाची रक्कम द्यावी

हरभरा उत्पादकांना क्विंटलमागे आठशे रुपयांची फरकाची रक्कम द्यावी

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारकडे ही मागणी केली आहे. नाफेडमार्फत हमीभावाने हरभरा खरेदी बंद झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. हरभरा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर पवारांनी ही मागणी केली आहे. 

हरभरा उत्पादकांना क्विंटलमागे आठशे रुपयांची फरकाची रक्कम द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारकडे केली आहे. नाफेडमार्फत हमीभावाने हरभरा खरेदी बंद झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. हरभरा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर पवारांनी ही मागणी केली आहे.

अजित पवार यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. 9 एप्रिल 2023 रोजी हरभरा खरेदी बंद केली. हरभरा विक्रीसाठी फक्त 17 दिवस मिळाले. त्यातले अर्धे दिवस अवकाळी पाऊस आणि सुट्ट्यांनी खाल्ले. शेतकऱ्यांचा हरभरा तसाच पडून आहे, असे या ट्विटमध्ये नमूद आहे.

 

हरभऱ्याचा हमीभाव 5,335 आणि बाजारात दर 4,500 रुपये. हरभऱ्यासाठी लावलेला पैसाही शेतकऱ्यांचा निघत नाही. उलट क्विंटलमागे 800 रुपयांचा तोटा आहे. हमीभाव आणि सध्याचा बाजारभाव यातली क्विंटलमागे आठशे रुपयांची फरकाची रक्कम सरकारने हरभरा उत्पादकांना द्यावी, अशी मागणी ट्विटद्वारे करण्यात आली आहे. 

खरेतर नाफेडने हरभरा खरेदी पूर्ण करण्याची अंतिम मुदत ही 11 जून आहे. मात्र, खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगून खरेदी बंद केली गेली आहे. त्यामुळे सरकारने नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांकडील हरभरा वाढीव उद्दिष्ट देऊन हमीभावाने खरेदी करायला हवा किंवा फरक द्यायला हावा, अशी मागणी जोर धरत आहे.

हे सुद्धा वाचा :

Sharad Pawar : मोदी सरकारचे धोरण शेतकरी विरोधी ; शरद पवार

सत्ताधारी आमदार, खासदारांच्या घरासमोर फेकणार कांदा; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

पोटाला चिमटा बसल्यावरच शेतकरी रागानं रस्त्यावर येतो ;अजित पवार संतापले

विदर्भातील अकोला जिल्ह्यात हमीभावाने हरभरा खरेदीवर नियंत्रणासाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; तसेच केंद्र सरकारकडे केली आहे.

Harbhara Utpadak, Ajit Pawar Magni, 800 Rupaye Farak, Harbhara Farak, Nafed Kharedi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी