31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमंत्रालयAjit Pawar Speech : अजितदादा म्हणाले, मी असा झापेन की...

Ajit Pawar Speech : अजितदादा म्हणाले, मी असा झापेन की…

चार विभागांची चर्चा सुरू आहे. पण या विभागांचे मंत्री सभागृहात उपस्थित नाहीत.

अत्यंत स्पष्ट व तिखट बोलण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार (Ajit Pawar) प्रसिद्ध आहेत. कुणाचाही मुलाहिजा न ठेवता ते धारदार शब्दांत समोरच्याची चंपी करीत असतात. जाहीर सभांमध्ये त्यांच्या या स्वभावाचे नेहमी दर्शन घडत असते. आज सभागृहातही त्यांनी एका सदस्याला सुनावले. प्रणिती शिंदे बोलत असताना बहुतांश मंत्री बाहेर निघून गेले होते. त्यावर आक्षेप घेण्यासाठी अजित पवार उभे राहिले. पण एका सदस्याने बसून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावर अजित पवार चांगलेच संतापले.‘मी असा झापेन की, तुमचा अपमान होईल’ अशा शब्दांत अजित पवारांनी संबंधित सदस्याला समज दिली. सभागृहात महत्वाच्या विषयावर चर्चा सुरू आहे. चार विभागांची चर्चा सुरू आहे. पण या विभागांचे मंत्री सभागृहात उपस्थित नाहीत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड यांना काही विषय हाताळायला दिले आहेत. पण संजय राठोड सुद्धा या ठिकाणी उपस्थित नाहीत. रवींद्र चव्हाण उपस्थित नाहीत. आम्ही सुद्धा मंत्री होतो. पण आम्ही पूर्ण दिवसभर सभागृहात थांबायचो, याकडेही अजित पवार यांनी लक्ष वेधले.

हे सुद्धा वाचा

Maharashtra Assembly Session 2022 : अंबादास दानवे कडाडले; शिंदे सरकारने बुलेट ट्रेनसाठी पैसे दिले, पण संभाजी – शाहू महाराजांच्या स्मारक रद्द केले

Maharashtra Assembly Session : विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरातांनी रस्त्यांची दुरावस्था वेशीवर टांगली

Amol Mitkari On Mohit Kamboj : मोहित कंबोज यांच्या ट्विटला अमोल मिटकरींनी दिले उत्तर

अजित पवार(Ajit Pawar) यांनी आक्षेप नोंदविल्यानंतर उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिले. संजय राठोड आताच बाहेर गेले आहेत. जाताना ते सांगून गेले आहेत. मी त्यांना निरोप देवून लगेच बोलावून घेतो. शिवाय मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार सभागृहातील चर्चेचे मुद्दे मी नोंदवून घेत असल्याचेही देसाई यांनी सांगितले.

दुसऱ्या एका चर्चेच्या अनुषंगाने अजित पवारांनी पुन्हा सभागृहातील सदस्यांवर तोंडसुख घेतले. सभागृहात बसून कुणीही बोलू नये. बोलायचे असेल तर उभे राहूनच बोलले पाहीजे. याविषयी सगळ्यांचे एकमत झालेले असताना काही सदस्य अजूनही बसूनच बोलतात. बसून बोलल्यामुळे ‘आ..रे..ला का…रे’ होते. एकनाथ शिंदे म्हणाले होते की, आम्ही ‘आ…रे..ला का..रे’ करतो. शिंदे यांचे हे म्हणणेच खालपर्यंत झिरपत असल्याची खिल्ली अजित पवार यांनी उडविली.
अजित पवार यांच्या या सुचनेच्या अनुषंगाने तालिका अध्यक्ष संजय शिरसाठ यांनी सुद्धा सदस्यांना सुचना केल्या. खाली बसून कुणी बोलू नका. काहीही कॉमेंटस् करू नका, अशा सुचना शिरसाठ यांनी केल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी