29 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमंत्रालयलय भारीने सर्वप्रथम मांडलेले आकाशवाणी स्थलांतर, वसुलीभाई सत्तारभाईचे प्रश्न अधिवेशनात गाजले

लय भारीने सर्वप्रथम मांडलेले आकाशवाणी स्थलांतर, वसुलीभाई सत्तारभाईचे प्रश्न अधिवेशनात गाजले

लय भारीने सर्वप्रथम मांडलेले आकाशवाणी स्थलांतर आणि वसुलीभाई सत्तारभाईचे प्रश्न अधिवेशनात चांगलेच गाजले. (Akashwani Pradeshik VruttaVibhag) कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या कृषी महोत्सव वसुली आणि कृषी खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सालगड्यागत वागणूक दिली असल्याचा मुद्दा लय भारीने चव्हाट्यावर आणला होता. त्याचबरोबर आकाशवाणीच्या पाचव्या मजल्यावरील मराठी प्रादेशिक वृत्तविभागावर गुपचूपपणे दिल्लीकडून हातोडा चालविला जात असल्याचे बिंगही लय भारीने फोडले होते. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून या प्रश्नाकडे लक्ष वेधले. दुसरीकडे, वसुलीभाई सत्तारभाई यांच्या कारनाम्याने शिंदे-फडणवीस सरकार चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांची वसुली आणि निजामशाही वागणूक लय भारीने उघड केल्यापासून ते संपर्कापलीकडे गायब आहेत.

सत्तार यांच्याविरोधात आजही विरोधकांनी भूखंड द्या… श्रीखंड घ्या! अशी घोषणाबाजी केली. सत्तार यांच्याविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. अजित पवार यांनी तर निर्लज्ज म्हणून त्यांची हेटाळणी केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना आपल्या भ्रष्टाचारविरोधी वल्गनांची आठवण करून दिली आहे. ते इतके का बदलले? भ्रष्टाचाराचे आरोप होताच मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी हटून बसणारे फडणवीस आता शांत का, असा सवाल राऊतांनी केला आहे. एकनाथ खडसे यांनी तर आपल्याला जो न्याय लावला गेला, त्याच प्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच राजीनामा मागितला आहे. एकूणच शिंदे यांच्यावरील आरोप आणि सत्तार यांच्या भ्रष्ट व सरंजामी वर्तनाने सरकारची चांगलीच गोची झाली आहे.

हे सुद्धा वाचा : 

शिंदे सरकार झोपेत; मुंबई आकाशवाणीच्या मराठी प्रादेशिक वृत्तविभागावर पडतोय दिल्लीचा हातोडा!

अब्दुल सत्तारांकडून कृषी अधिकाऱ्यांची सालगड्यागत अवस्था; संपूर्ण कृषी खाते कृषिमंत्र्यांच्या दावणीला!

आगामी निवडणुकीत सुपर गद्दार, निर्लज्ज पुरंदरच्या बापूला गाडायलाच हवे !

सत्ताधारी अडचणीत असताना आज छगन भुजबळ यांनी आकाशवाणीतील गडबड घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. या प्रकरणात राज्य सरकार गंभीरपणे लक्ष घालेल, असे आश्वासन त्यांनी दिले. मुंबई आकाशवाणीतील पाचव्या मजल्यावरील प्रादेशिक वृत्त विभाग कोणत्याही परिस्थितीत हलविला जाणार नाही, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली. तत्पूर्वी, आकाशवाणी इमारतीत पाचव्या मजल्यावर पाडकाम सुरू असून मराठी प्रादेशिक वृत्तविभागावर हातोडा चालविला जात असल्याचा मुद्दा भुजबळ यांनी मांडला होता. पेडर रोडवरील फिल्म डिव्हिजन कार्यालय हालविले जाणार असून ते आकाशवाणी इमारतीत नेणार आहेत. त्यासाठी आकाशवाणीच्या मराठी वृत्तविभागावर अन्याय होत आहे. राजधानीतूनच मराठी कशी पोरकी केली जात आहे, याबाबत भुजबळ यांनी आश्चर्य व्यक्त केले होते.

Akashwani Pradeshik VruttaVibhag, Lay Bhari News Expose Chhagan Bhujabal, CM Shinde

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी