28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमंत्रालयBalasaheb Patil : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कार्यालयाची वेसण भाजपच्या सुभाष...

Balasaheb Patil : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कार्यालयाची वेसण भाजपच्या सुभाष देशमुखांकडे

टीम लय भारी

मुंबई : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कार्यालयात माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या कार्यकाळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा भरणा आहे ( Balasaheb Patil appointed Subhash Deshmukh’s staff in his office ). त्यामुळे बाळासाहेब पाटील यांच्या कार्यालयाची जबाबदारी सुभाष देशमुखांकडे आहे की काय असा सवाल उपस्थित झाला आहे.

पाटील यांच्या कार्यालयात संतोष पाटील हे खासगी सचिव म्हणून काम करतात. पाटील हे मागील सरकारमध्ये सुभाष देशमुखांकडे विशेष कार्य अधिकारी होते. बाळासाहेब पाटील यांच्या बंगल्यावरील दोन खानसामे ( आचारी ), सुनील गवळी नावाचे वाहन चालक, वसेकर नावाचे स्वीय सहायक, टेलिफोन ऑपरेटर हा कर्मचारी वर्ग सुभाष देशमुख यांच्याकडे काम करीत होता. ( Six employees working in Balasaheb Patil’s office, who was worked for Subhash Deshmukh in previous government)

हे सुद्धा वाचा : मंत्री अशोक चव्हाणांच्या कार्यालयाची धुरा गिरीश महाजनांच्या ‘आदर्श’ सेनापतीकडे

बाळासाहेब पाटील यांच्याकडे कार्यरत असलेल्या अधिकारी – कर्मचाऱ्यांमधील जवळपास सहा जण सुभाष देशमुख यांच्याकडे कार्यरत होते. सुभाष देशमुख यांनी ‘प्रशिक्षीत’ केल्यानुसारच आता ते पाटील यांच्याकडे काम करत असतील, अशी प्रतिक्रिया सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना व्यक्त केली.

Balasaheb Patil : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कार्यालयाची वेसण भाजपच्या सुभाष देशमुखांकडे

हे सुद्धा वाचा : मंत्री एकनाथ शिंदेच्या कार्यालयात बिनकामाचे अधिकारी, नगरविकास विभाग मंत्री कार्यालयावर नाराज

सुभाष देशमुख यांनीच पवारांविरोधात चौकशी लावली होती

‘महाराष्ट्र राज्य सहकारी बँक’ प्रकरणी सुभाष देशमुख यांच्या सहकार खात्यानेच चौकशी केली होती. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयातही गेले होते. सहकार विभागाच्या खटाटोपामुळेच ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडाला ईडीने अजित पवार व शरद पवार यांच्या विरोधात प्रकरण तापविले होते. या सगळ्यांची सुरूवात सहकार विभागाने केली होती.

हे सुद्धा वाचा : छगन भुजबळांच्या ओएसडीने महिलेला कार्यालयाबाहेर हाकलले, महिलेने घातला गोंधळ !

सहकारी संस्थांच्या चौकशी, सुनावण्या याबाबत संतोष पाटील हेच सुभाष देशमुखांना मार्गदर्शन करायचे. त्यामुळे अजित पवार व शरद पवार यांच्या मागे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा ससेमिरा लावण्यामागेही पाटील यांचा होता अशी मंत्रालयात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

आमदार – खासदारांमध्येही नाराजी

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांच्या विविध सहकारी संस्था आहेत. यांत साखर कारखाने, सूत गिरण्या, दुध संघ अशा संस्थांचा समावेश आहे. या संस्थांच्या मागे भाजप सरकारने ससेमिरा लावला होता.

हे सुद्धा वाचा : मंत्रालयातील IAS अधिकारी टेबल साफ करतात, चहाचे कपही धुतात

Mahavikas Aghadi

यावेळी विविध सुनावण्यांसाठी या सहकारी संस्थांचे प्रवर्तक या नात्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, खासदार व पदाधिकारी उपस्थित राहायचे. या सुनावण्यांचे नियोजन संतोष पाटील हेच करीत होते. या संतोष पाटलांनीच आम्हाला नको तेवढा त्रास दिला होता.

संतोष पाटील हे जणू काही भाजपचे कार्यकर्ते आहेत, अशाच पद्धतीने आम्हाला छळायचे. असे असतानाही बाळासाहेब पाटील यांनी मागील सरकारमधील या अधिकाऱ्याला व इतर कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यालयात कसेकाय घेतले असा सवाल अनेक आमदार व खासदारांनी केला आहे.

( Congress, NCP upset on Balasaheb Patil )

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी