35 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
Homeमंत्रालयEknath Shinde Cabinet Expansion : दरेकर, पंकजाताई, राम शिंदे, पडळकर, सदाभाऊ यांना...

Eknath Shinde Cabinet Expansion : दरेकर, पंकजाताई, राम शिंदे, पडळकर, सदाभाऊ यांना मंत्रीमंडळात स्थान नाही

पंकजाताई व सदाभाऊ खोत या दोघांकडे तर कोणत्याच सभागृहाचे सदस्यत्व नाही. त्यामुळे मातब्बर असूनही या सगळ्या नेत्यांना मंत्रीपद मिळणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

मंत्रीमंडळात कुणाची वर्णी लागणार यावर विविध शक्यता वर्तविण्यात येत आहेत. पण भाजपमधील अनेक मातब्बर नेत्यांना मंत्रीपदाची संधी मिळणार नाही. एवढेच नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अनेकांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार नसल्याची माहिती हाती आली आहे. प्रवीण दरेकर, राम शिंदे, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत या फडणवीस यांच्या जवळच्या व्यक्तींना मंत्रीमंडळात स्थान मिळणार नाही. भाजपच्या मातब्बर नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांनाही मंत्रीमंडळात स्थान मिळणार नसल्याची माहिती सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितली.
विधानसभा निवडणुकीत यश मिळविलेल्या नेत्यांनाच मंत्रीमंडळात स्थान दिले जाणार आहे. दरेकर, राम शिंदे, पडळकर हे नेते विधानपरिषदेचे आमदार आहेत.(Eknath Shinde)

हे सुद्धा वाचा

Maharashtra Assembly Session 2022 : विधिमंडळ अधिवेशन केलं ‘चिमुकलं’ !

Eknath Shinde cabinet Expansion : पहिल्या दिवशी मंत्रीपदाची झूल, दुसऱ्या दिवशी अधिवेशनाच्या औताला झुंपणार !

Maharashtra Cabinet : ‘अब्दुल सत्तार शिक्षणमंत्री होतील’

पंकजाताई व सदाभाऊ खोत या दोघांकडे तर कोणत्याच सभागृहाचे सदस्यत्व नाही. त्यामुळे मातब्बर असूनही या सगळ्या नेत्यांना मंत्रीपद मिळणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.मंत्रीमंडळाचा विस्तार मंगळवारी होणार आहे. त्यानंतर बुधवारी विधिमंडळाचे अधिवेशन होणार आहे. मंत्रीमंडळात स्थान मिळालेल्या नेत्यांना तातडीने मुंबईत बोलाविण्यात आले आहे. यात राधाकृष्ण विखे – पाटील, चंद्रकांत पाटील, गुलाबराव पाटील, उदय सामंत, संजय शिरसाट आदी नेत्यांची नावे आहेत. आणखी नेत्यांची नावे लवकरच पुढे येतील.

विशेषत: प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर, राम शिंदे यांना मंत्रीमंडळात निश्चित स्थान असेल असे बोलले जात होते. देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यातील ताईत ही या तिघांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. पण तिघांनाही मंत्रीमंडळात स्थान मिळालेले नाही.

जे नेते विधानसभा निवडणूक लढवून आमदार झालेले आहेत. त्यांनाच मंत्रीपद देण्याच्या सूचना केंद्रातून आलेल्या आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या निकट असून सुद्धा दरेकर, पडळकर व शिंदे यांचा पत्ता कट झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी