29 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमंत्रालयEknath Shinde cabinet Expansion : पहिल्या दिवशी मंत्रीपदाची झूल, दुसऱ्या दिवशी अधिवेशनाच्या...

Eknath Shinde cabinet Expansion : पहिल्या दिवशी मंत्रीपदाची झूल, दुसऱ्या दिवशी अधिवेशनाच्या औताला झुंपणार !

आपल्याला कोणते खाते मिळणार आहे, संबंधित मंत्र्यांना अद्याप निटसे समजलेले नाही. फारतर आज किंवा उद्या त्यांना खात्याविषयी अधिकृत माहिती मिळेल.

सध्या अल्पसंख्याक असलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मंत्रीमंडळाचा उद्या (ता. ९, बुधवारी) विस्तार होणार आहे. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत टाचा घासल्यानंतर अखेर मंत्रीमंडळाच्या विस्ताराला कसाबसा मुहूर्त मिळाला आहे. मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी रवाना व्हा, असे तातडीचे निरोप मिळाल्याने संबंधित भावी मंत्री मुंबईकडे रवाना होत आहेत. मंत्रीपदाची झूल अंगावर पडणार असल्याने बेंदराच्या बैलाप्रमाणे या भावी मंत्र्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे. मात्र शपथ घेताच लगेचच दुसऱ्या दिवशी अधिवेशनाच्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. विधिमंडळ अधिवेशन येत्या १० ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

लांबणीवर पडलेला मंत्रीमंडळ विस्ताराला व पावसाळी अधिवेशनाला अखेर एका मागोमाग एक मुहूर्त मिळाले आहेत. आपल्याला कोणते खाते मिळणार आहे, संबंधित मंत्र्यांना अद्याप निटसे समजलेले नाही. फारतर आज किंवा उद्या त्यांना खात्याविषयी अधिकृत माहिती मिळेल. खात्याचा पुरेसा अभ्यास झालेला नसतानाच या नव्या मंत्र्यांना अधिवेशनाच्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

अधिवेशनात विरोधकांकडून अवघड व अडचणींचे प्रश्न उपस्थित केले जातात. ज्या खात्याशी संबंधित प्रश्न आहे, त्याच खात्याच्या मंत्र्यांना उत्तर द्यावे लागते. त्यामुळे संबंधित प्रश्नाबाबत मंत्र्यांना अगोदरच तयारी करून यावे लागते. नव्या मंत्र्यांना अभ्यास करण्यास पुरेसा वेळ मिळणार नसल्याने ते तयारी कशी करणार व विधीमंडळात प्रश्नांची उत्तरे कशी देणार असा सवाल उपस्थित झाला आहे.

हे सुद्धा वाचा

Maharashtra Assembly Session 2022 : विधिमंडळ अधिवेशन केलं ‘चिमुकलं’ !

Maharashtra Cabinet : ‘अब्दुल सत्तार शिक्षणमंत्री होतील’

Maharashtra Cabinet : अखेर मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला

मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नियमित अधिवेशनाला सामोरे जावे लागण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल, असे सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.नियमित पद्धतीनुसार पावसाळी अधिवेशन अवघ्या सहा दिवसांचे होणार आहे. या चिमुकल्या अधिवेशनात प्रश्नांची संख्याही कमी होईल. त्यामुळे कदाचित मंत्र्यांवरील संभाव्य भार कदाचित हलका होऊ शकतो. पण काही अवघड प्रश्नांना सामोरे जावे लागू शकते. टीईटी परीक्षेतील अब्दुल सत्तार यांच्या मुलींचा घोटाळा मंत्रीमंडळ विस्तार व अधिवेशनाच्या तोंडावर उघड झाला आहे. त्यामुळे विरोधक सरकारला धारेवर धरतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

याशिवाय पुरग्रस्त परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न इत्यादी विषयांवर सुद्धा अधिवेशनात जोरदार चर्चा होऊ शकेल, असे सूत्रांनी सांगितले.साधारण दोन आठवडे तरी अधिवेशन व्हायला हवे, असे संकेत आहेत. पण अवघ्या सहा दिवसांचे अधिवेशन आयोजित करण्याचा निर्णय विधिमंडळाच्या कामकाज समितीने घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. १० ते १८ ऑक्टोबर या कालावधीत अधिवेशन होणार आहे. पण त्यात तीन दिवस सुट्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात अवघे सहा दिवसच अधिवेशन चालणार आहे. विधीमंडळ कामकाज समितीने आज बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत चिमुकले अधिवेशन आयोजित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे सरकार सत्तेत असताना ‘कोरोना’चा मोठा कालावधी होता. या कालावधीत काही अधिवेशने रद्द झाली होती, तर नंतरची काही अधिवेशने ‘आखूड’ करण्यात आली होती. अधिवेशन आयोजित करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप त्यावेळी विरोधात असलेल्या भाजपकडून करण्यात येत होता. लोकशाहीची पायमल्ली केली जात असल्याचाही आरोप केला जात होता.

भाजपप्रणीत एकनाथ शिंदे सरकार सत्तेत येवून एक महिना उलटून गेला. तरीही या नव्या सरकारला मंत्रीमंडळ विस्तार करण्यास सवड मिळालेली नाही. किंबहूना अधिवेशनाचा विस्तार करण्यास सुद्धा सरकारला मुहूर्त मिळालेला नव्हता. गेल्या महिन्यात मंत्रीमंडळ विस्तार होणार होता. पण ती तारीख अचानक पुढे ढकलण्यात आली. गेल्या महिन्यातील अधिवेशन हे दोन आठवड्यांच्या कालावधीचे होणार होते. परंतु ते रद्द करण्यात आले. आताचे अधिवेशन अवघ्या सहा दिवसांचे होणार आहे.

सरकारमध्ये एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे दोघेच मंत्री आहेत. मंगळवारच्या विस्तारात आणखी साधारण १५ मंत्री येतील. या नव्या मंत्र्यांना दुसऱ्याच दिवशी अधिवेशनाला सामोरे जावे लागणार आहे. नवीन मंत्र्यांना आपल्या खात्याची कसलीच कल्पना नसल्याने विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे जिकीरीचे होईल. त्यामुळे हे अधिवेशन चिमुकले केले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी