29 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमंत्रालयEknath Shinde Cabinet : नव्या मंत्र्यांकडे पीएस, ओएसडी पदे मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांचे लॉबिंग

Eknath Shinde Cabinet : नव्या मंत्र्यांकडे पीएस, ओएसडी पदे मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांचे लॉबिंग

एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला आहे. नव्याने १८ मंत्र्यांना संधी मिळाली आहे. आता या मंत्र्यांकडे खासगी सचिव (पीएस) व विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) या पदांवर संधी मिळावी यासाठी अधिकाऱ्यांनी लॉबिंग सुरू केले आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला आहे. नव्याने १८ मंत्र्यांना संधी मिळाली आहे. आता या मंत्र्यांकडे खासगी सचिव (पीएस) व विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) या पदांवर संधी मिळावी यासाठी अधिकाऱ्यांनी लॉबिंग सुरू केले आहे. नव्या मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्र्यांनी यापूर्वी सुद्धा मंत्री म्हणून काम केलेले आहे. त्यामुळे प्रत्येक मंत्री आपापले जुनेच अधिकारी नव्या कार्यालयात आणण्याची शक्यता आहे. इच्छूक असलेल्या अधिकाऱ्यांपैकीही बऱ्याचशा अधिकाऱ्यांचे जुने मंत्री पुन्हा सत्तेत आले आहेत.जुने नाते असलेले मंत्री व अधिकारी पुन्हा एकत्र येवून काम सुरू करतील.परंतु बरेच अधिकारी असे आहेत, की ज्यांनी यापूर्वी ज्या मंत्र्यांकडे काम केले होते ते मंत्री सत्तेत आलेले नाहीत.

महाविकास आघाडी सरकार तसेच पूर्वीच्या देवेंद्र फडणवीस सरकारमधील बऱ्याच अधिकाऱ्यांना नव्या मंत्र्यांचा शोध घ्यावा लागणार आहे.मंत्र्यांकडे खासगी सचिव (पीएस) म्हणून संधी मिळावी यासाठी बहुतांश सगळेच अधिकारी प्रयत्नशिल असतात. परंतु पीएस म्हणून संधी मिळाली नाही तर किमान ओएसडी म्हणून तरी संधी मिळावी यासाठी या अधिकाऱ्यांचा प्रयत्न असतो.

खासगी सचिव या पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याचे संपूर्ण मंत्री कार्यालयावर नियंत्रण असते. तसेच खात्याअंतर्गत मंत्रालयापासून ते क्षेत्रीय कार्यालयापर्यंत आयएएस अधिकारी वगळता अन्य प्रमुख अधिकाऱ्यांवरही खासगी सचिवांची वचक असते. खासगी सचिवांप्रमाणेच मंत्री विविध उपविषयांचे अधिकार ओएसडींना देतात. खासगी सचिवांपेक्षा काही प्रमाणात कमी ताकदीचे अधिकार ओएसडींकडे असतात.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde Cabinet Expansion : दीपक केसरकरांना मंत्रीपद, निलेश राणेंची मात्र फजिती !

Eknath Shinde Cabinet Expansion : एकनाथ शिंदे म्हणाले, मोदी – शाह यांनी महाराष्ट्राच्या विकासाबाबत नवीन निर्णय घेतले आहेत

Eknath Shinde cabinet expansion : चित्रा वाघ एकाकी; शिंदे गट संजय राठोडांच्या पाठीशी, भाजपने हात वर केले, विरोधकांनीही राठोड निर्दोष असल्याचे सांगितले

मंत्र्यांना प्रशासकीय कामात मदत करणे, वादग्रस्त विषयांमध्ये योग्य सल्ला देणे, फायद्याचे व डोकेदुखीचे विषय याबाबत मंत्र्यांना अवगत करणे अशी महत्वपूर्ण कामे पीएस व ओएसडी करीत असतात.या शिवाय मंत्र्यांच्या बैठकांचे आयोजन करणे, छोट्या मोठ्या राजकीय बाबींचे मंत्र्यांना आकलन करून देणे अशा बाबीही पीएस व ओएसडी सांभाळत असतात. सर्वात महत्वाचे म्हणजे, खात्यातील कमाईचे मार्ग सांगणे व त्यांची अचूक अंमलबजावणी करण्याची क्लृप्ती सुद्धा खासगी सचिव व ओएसडी यांच्याकडे असते. काही मंत्र्यांना विविध छंद असतात. हे छंद जोपासण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी पुरविणारेही काही स्पेशालिस्ट ओएसडी असतात. त्या पार्श्वभूमीवर मंत्री व पीएस-ओएसडी यांचे नाते महत्वाचे असते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी