28 C
Mumbai
Sunday, September 4, 2022
घरमंत्रालयEknath Shinde Cabinet Expansion : एकनाथ शिंदे म्हणाले, मोदी – शाह यांनी...

Eknath Shinde Cabinet Expansion : एकनाथ शिंदे म्हणाले, मोदी – शाह यांनी महाराष्ट्राच्या विकासाबाबत नवीन निर्णय घेतले आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृह मंत्री अमित शाह यांनी मागील दोन – तीन बैठकांमध्ये महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास वेगाने होईल.

आमचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. आम्ही सर्व घटकांना न्याय देणार आहोत. आम्ही कामे करून दाखवणार आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृह मंत्री अमित शाह यांनी मागील दोन – तीन बैठकांमध्ये महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास वेगाने होईल. त्यासाठी मी मोदी – शाह यांचे आभार मानतो, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. मंत्रीमंडळाचा आणखी विस्तार होणार आहे.

त्यात आणखी मंत्रीपदे दिली जातील. आमच्या आमदारांपैकी कुणीही नाराज नाहीत. संजय शिरसाट हे सुद्धा नाराज नाहीत. ते मंत्रीमंडळाच्या शपथविधीच्या वेळी या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी ते तुम्हाला नाराज दिसले का ? असा प्रतिप्रश्न सुद्धा शिंदे यांनी पत्रकारांना केला.

संजय राठोड यांच्या विरोधात चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपाबाबत सुद्धा एकनाथ शिंदे यांनी टिप्पणी केली. संजय राठोड यांना पोलिसांकडून क्लिन चीट मिळालेली आहे. पण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. कुणाचा काही आक्षेप, तक्रार असेल तर आम्ही चर्चा करू शकतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde cabinet expansion : चित्रा वाघ एकाकी; शिंदे गट संजय राठोडांच्या पाठीशी, भाजपने हात वर केले, विरोधकांनीही राठोड निर्दोष असल्याचे सांगितले

Eknath Shinde Cabinet Expansion : सुप्रिया सुळे म्हणाल्या, संजय राठोडांना मंत्रीपद मिळाल्याचा मनापासून आनंद

Eknath Shinde cabinet Expansion : मंत्रिमंडळातून नितेश राणेंचा पत्ता कट, पण दीपक केसरकरांना संधी

दरम्यान, महिलांना योग्य प्रतिनिधीत्व दिले जाईल. महाविकास आघाडी सरकारने सुद्धा पहिल्या मंत्रीमंडळात महिलांना स्थान दिले नव्हते, असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. संजय राठोड प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे त्यावर मी काहीही बोलणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

हा छोटा विस्तार आहे. भविष्यात आणखी मोठा विस्तार केला जाईल. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मंत्रीमंडळाचा विस्तार होणे अपेक्षित होते. पण स्वातंत्र्य दिनानंतर संपूर्ण विस्तार होईल, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी