29 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरमंत्रालयदेवेंद्र फडणवीस यांच्या सचिव पदी डाॅ. श्रीकर परदेशी यांची नियुक्ती

देवेंद्र फडणवीस यांच्या सचिव पदी डाॅ. श्रीकर परदेशी यांची नियुक्ती

टीम लय भारी

मुंबईः राज्याचे नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सचिवपदी डाॅ.श्रीकर परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 30 जूनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.डाॅ.श्रीकर परदेशी हे 2001 च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. ते 2015 पासून पंतप्रधान कार्यालयात कार्यरत होते. महाराष्ट्रातील एक गुणी सनदी अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.

श्रीकर परदेशी यांनी ऑनलाईन नोदणी सुरु केली. तसेच नोंदणी महानिरीक्षक म्हणून राज्यातील नोंदणी कार्यालयांमधील भ्रष्टाचार आणि दलालांना रोखण्यासाठी प्रयत्न केले होते. नांदेड जिल्हाधिकारीपदाची सुत्रेही त्यांनी सांभाळली. त्यावेळी त्यांनी काॅपीला आळा तसेच शाळांमधील पटपडताळणीचा कार्यक्रम राबविला. चिंचवडच्या आयुक्तपदी असतांना त्यांनी अनधिकृत बांधकामांना आळा घातला होता. राज्यातील भरीव कामगिरीमुळे त्यांना पंतप्रधान कार्यालयातून निमंत्रण आले. त्यानंतर त्यांची दिल्लीला बदली झाली होती.

राज्यात बंडखोरी करुन एकनाथ शिंदे गटाने सत्ता परिवर्तन केले. मात्र असे असले तरी केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचाच शपथविधी पार पडला. अजून मंत्री मंडळाचा विस्तार झाला नाही. तसेच कोणत्या कोणत्या मंत्र्याला कोण सचिव मिळणार याची उत्सुकता राजकारण्यांना होती. त्यापैकी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डाॅ.श्रीकर परदेशी हे सचिव म्हणून लाभले आहेत.राज्याचा गाडा हाकण्यासाठी मंत्रीमंडळाची गरज आहे. तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना मदत करण्यासाठी सचिवांची गरज असते. सद्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दोघे जण राज्याचा गाडा हाकत आहेत.

हे सुध्दा वाचा:

स्त्री लंपट भाजप नेत्याची अखेर हकालपट्टी !

राजनाथ सिंह ‘सलाम वालेकूम‘ का म्हणाले?

अभिनेता शाहिद कपूर पत्नीला वैतागला

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!