31 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमंत्रालयगिरीश महाजन : एक धडाडीचे तडफदार नेतृत्व

गिरीश महाजन : एक धडाडीचे तडफदार नेतृत्व

सलग सहावेळा जामनेरमधून विधानसभेवर निवडून आलेले राज्याचे ग्रामीण विकास व पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री असलेले, धडाडीचे तडफदार नेतृत्व गिरीश महाजन यांच्याविषयी ख्यातनाम स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. तुषार पालवे यांनी व्यक्त केलेल्या या भावना.

राज्याचे ग्रामीण विकास व पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री असलेले, धडाडीचे तडफदार नेतृत्व गिरीश महाजन यांच्याविषयी ख्यातनाम स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. तुषार पालवे यांनी व्यक्त केलेल्या या भावना.

अवघ्या महाराष्ट्राला ‘भाऊ’ या नावाने परिचित असलेले, संकटमोचक अशी ख्याती लाभलेले आणि कायम पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे अशी ओळख असणारे व्यक्तिमत्व म्हणजेच जामनेरचे विद्यमान आमदार आणि वैद्यकीय खात्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन साहेब अर्थातच ‘भाऊ’.

गिरीश महाजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत, यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.
गिरीश महाजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत, यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. (फोटो क्रेडिट : गुगल/ ट्विटर)

गिरीश महाजन साहेबांच्या कारकिर्दीची सुरुवात 1980च्या दशकाच्या सुरुवातीला झाली. तत्पूर्वी महाविद्यालयात असताना ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य होते. त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात तळागाळातील कार्यकर्ता म्हणून केली आहे. झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीमुळेच त्यांची अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आपल्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीला ते महाराष्ट्रातील युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बनले. 1992मध्ये जामनेरमधून ते ग्राम पंचायत निवडणूक जिंकले. त्यानंतर लगेचच 1995मध्ये ते प्रथमच महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर सलग सहावेळा जामनेरमधून विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यांचा हा तळागाळातील कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्री इथपर्यंतचा प्रवास थक्क करणारा. कॅबिनेट मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यापासूनचा त्यांच्या कामाचा झपाटा आणि झंझावात वाखाणण्याजोगा आणि प्रेरणादायी असाच आहे.

ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री या नात्याने ग्रामीण विकास व पंचायती राज विकास झाल्यास देशाचा कायापालट होईल यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळेच देशातील प्रत्येक नागरिकाला अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार मिळावा आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तसेच ग्रामीण नागरिक, महिला सक्षमीकरण, त्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी ग्राम विकास विभाग हा खूप महत्त्वाचा असून शहरांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी ग्रामीण विकासाच्या माध्यमातून अमुलाग्र बदल करावयाचा गिरीश महाजन साहेबांचा मानस आहे. त्यासाठी शासन प्रयत्नशील असणार आहे. शहरे आणि गावे स्वच्छ करण्यावर ते भर देत आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येकाला पक्के घर मिळावे, घरी नळाचे पाणी आणि वीज असावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

क्रीडा व युवा कल्याण मंत्री या नात्याने युवा खेळाडूंनी देशाचे नाव उज्वल करावे आणि जागतिक दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासन आणि एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल क्लब यांच्यात गिरीश महाजन साहेबांच्या पुढाकाराने सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्या अंतर्गत फुटबॉल हा जगातील सर्वात जास्त लोकप्रिय खेळ असल्यामुळे त्याला चालना देण्यासाठी शासन प्रोत्साहन देत आहे. त्याअनुषंगानेच 36 जिल्ह्यांमध्ये फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. हजारोंच्या संख्येने विद्यार्थी त्यात सहभागी झाले होते. त्यातून 9 ते 14 वयोगटातील 20 विद्यार्थी निवडण्यात आले. हे विद्यार्थी आता जर्मनीमध्ये खेळाचे प्रशिक्षण घेण्यासाठी जाणार आहेत. खेळाडूंच्या शारीरिक व बौद्धिक क्षमतेच्या सुदृढतेकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युवा पिढीला सर्व सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील अशी ग्वाही क्रीडामंत्री गिरीश महाजन साहेबांनी दिली आहे.

 

युवा पिढीच्या भवितव्याकडे जातीने लक्ष देत असतानाच हे लक्षात येते की ते स्वतः एक अतिशय उत्साही आणि सक्रिय व्यक्तिमत्व आहे आणि याचा प्रत्यय नुकताच आंबेडकर जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत त्यांनी उत्साहाने खेळलेल्या लेझीम कडे पाहून आला.

वैद्यकीय शिक्षण कॅबिनेट मंत्री या नात्याने त्यांनी हाती घेतलेली विविध प्रकारची जनजागृतीची अभियाने नागरिकांच्या सर्वांगीण आरोग्य आणि विकासावर भर देणारी आहेत. यात त्यांनी अतिशय अभ्यासू वृत्तीने समाजाला भेडसावणाऱ्या अशा विविध आरोग्य समस्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे.आणि या आरोग्य समस्यांचे निराकरण करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. ते राबविण्यास सुरुवातही झाली आहे. त्यात प्रामुख्याने अवयवदान अभियान, स्तनांचे कर्करोग तपासणी अभियान, रक्तदान अभियान, स्वच्छ मुख आरोग्य अभियान, अंधत्व निवारण, मिशन थायरॉईड, मिशन ऑस्टिओपोरोसिस, लठ्ठपणा जागरूकता आणि उपचार अशा विविध अभियानांचा समावेश आहे. यात उल्लेख करावा असे शिवजयंतीच्या निमित्ताने त्यांनी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये महारक्तदान अभियानाची केलेली सुरुवात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शासकीय रुग्णालयांमध्ये विविध आरोग्य समस्यांच्या जनजागृतीच्या अभियानांच्या उद्घाटनांचा झपाटा तोंडात बोट घालायला लावेल असाच आहे.

येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे 2023 पासून गिरीशभाऊंनी महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण मराठीतून उपलब्ध होणार असल्याचे घोषित केले आहे. तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पुढील वर्षापासून मेडिकल कॉलेज उभारण्याबरोबरच महाराष्ट्र मेडिकलची 1,500 पदे दोन महिन्यात भरणार येणार असल्याचीही घोषणा त्यांनी नुकतीच केली आहे. असे विविध उपक्रम त्यांनी हाती घेतले असून, ‘हाती घ्याल, ते तडीस न्याल’ अशा पद्धतीचा त्यांचा स्वभाव असल्यामुळे पुढील काळात वैद्यकीय क्षेत्राला सुवर्ण दिवस नक्कीच पाहायला मिळणार यात वाद नाही.

अशा धडाडीच्या नेतृत्वाला जवळून अनुभवण्याचा योग आला तो म्हणजे स्तनाचा कर्करोग अभियानाची जबाबदारी नोडल ऑफिसर म्हणून माझ्यावर सोपविण्यात आली त्यानिमित्ताने. महिला दिनाचे औचित्य साधून स्तन कर्करोग निदान व उपचार याबाबत जनजागृती करण्यासाठी सकाळी आठ वाजता भव्य रॅली आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच स्तन कर्करोगावरील निदान लवकरात लवकर व्हावे, महिलांना अद्ययावत आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी कामा रुग्णालयामध्ये नवीन स्तन कर्करोग बाह्य रुग्णविभाग आणि ॲन्कोलॉजी विभाग सुरू करण्यात आला. त्याचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री या नात्याने गिरीश महाजन साहेबांच्या हस्ते करण्यात आले. हा शासकीय रुग्णालयामधील पहिला स्तन कर्करोग बाह्य रुग्ण विभाग आहे. यामध्ये स्तनाच्या विविध रोगांचे तपशीलवार मूल्यांकन, निदान आणि उपचारासाठी सेवा प्रदान करण्यात येणार आहे. उपचार हे मोफत असणार असल्याची घोषणा महाजन साहेबांनी त्यांच्या भाषणात केली. त्यासोबतच आयव्हीएफ सेंटरचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.

 

हे सुद्धा वाचा : 

Girish Mahajan : क्रीडा धोरणाबाबत क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला सकारात्मक पवित्रा

गिरीश महाजनांच्या पुढाकाराने छत्रपती शिवरायांच्या नावाने भव्य स्पर्धा

गिरीश महाजनांची मोहीम, आरोग्यविषयक उपक्रम मोठ्या संख्येने राबविणार !

अशा पद्धतीने समाजाच्या विविध अंगांचा अभ्यास करणारा नेता विरळाच. गिरीशभाऊंच्या कामातून दिसते ती त्यांची देशाच्या ग्रामीण आणि शहरी विकासासाठी असलेली तळमळ, समाजाला भेडसावणाऱ्या आरोग्य समस्यांबाबत डोळस आणि अभ्यासुवृत्ती, युवा पिढीला सुदृढतेकडे नेण्याचा ध्यास ठेवणारी मनोवृत्ती आणि महिला सक्षमीकरणासाठी असलेली दूरदृष्टी. म्हणूनच निर्भीड आणि तडफदार अशा नेत्याला त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

(डॉ. तुषार पालवे हे प्रसिद्ध स्त्री रोगतज्ज्ञ आहेत.)

Girish Mahajan, Medical Education Minister, Jamner MLA, Courageous Leadership, Dr. Tushar Palwe

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी