30 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
Homeमंत्रालयगोपीनाथ मुंडे यांचे दोन विश्वासू ‘महाविकास आघाडी’ सरकारमध्ये सर्वोच्च पदावर

गोपीनाथ मुंडे यांचे दोन विश्वासू ‘महाविकास आघाडी’ सरकारमध्ये सर्वोच्च पदावर

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते कै. गोपीनाथ मुंडे राज्यात उपमुख्यमंत्री पदावर कार्यरत असताना त्यांच्याकडे दोन अधिकारी काम करीत होते. आता हे दोन्ही अधिकारी राज्याच्या प्रशासनात लागोपाठ सर्वोच्च पदावर गेले आहेत ( Gopinath Munde’s two collegues at top post ).

राज्याच्या प्रशासनातील सर्वोच्च पद म्हणजे मुख्य सचिव ! या पदावरून अजोय मेहता हे येत्या ३० जून रोजी निवृत्त होत आहेत ( Ajoy Mehta will retire on 30th June ) . त्यानंतर नवे मुख्य सचिव म्हणून संजयकुमार सूत्रे हाती घेतील ( Sanjay Kumar will be new Chief Secretary ). अजोय मेहता व संजयकुमार या दोन्ही अधिकाऱ्यांनी तत्कालिन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे ( Gopinath Munde was Deputy CM ) यांच्याकडे काम केले होते.

गोपीनाथ मुंडे यांचे दोन विश्वासू ‘महाविकास आघाडी’ सरकारमध्ये सर्वोच्च पदावर

अजोय मेहता हे गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यालयाचे सुरूवातीला सचिव होते, त्यानंतर संजयकुमार सचिवपदावर आले होते. मुंडे यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या सुरूवातीच्या काळात संजयकुमार हे बीड येथे जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते. मुंडे आणि संजयकुमार यांची वेव्हलेन्थ चांगलीच जुळली. त्यामुळे त्यानंतर मुंडे यांनी संजयकुमार यांना आपल्या कार्यालयात सचिव पदासाठी पाचारण केले ( Ajoy Mehta and Sanjay kumar was secretary in the Gopinath Munde’s office ).

संजयकुमार यांनी बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद इत्यादी जिल्ह्यांमध्ये कामे केली होती. उपमुख्यमंत्री कार्यालयातील सचिव पदाच्या निमित्ताने त्यांची पहिल्यांदाच मंत्रालयात एंट्री झाली.

MoneySpring

राज्यात सन १९९५ ते १९९९ या काळात शिवसेना – भाजप युतीचे सरकार सत्तेवर होते. त्या अगोदरच्या सरकारमध्ये शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर सत्तेवर आलेल्या शिवसेना – भाजप युतीच्या सरकारमध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री व गोपीनाथ मुंडे उपमुख्यंत्री होते.

हे सुद्धा वाचा

Gopinath Munde death Anniversary : गोपीनाथ मुंडे पोळी – रस खाऊन गेले, अन् परत आलेच नाहीत, पंकजाताईंनी जागवल्या आठवणी

पंकजाताई म्हणाल्या, माझ्या स्वाक्षरीमध्येही गोपीनाथ मुंडे यांचे नाव

शरद पवार हे राज्यातील लोकप्रिय नेते होतेच, पण प्रशासनावरही त्यांची मजबूत पकड होती. पवारांप्रमाणेच गोपीनाथ मुंडे यांचीही त्यावेळी राज्यात अफाट लोकप्रियता होती ( Gopinath Munde was popular leader ). प्रशासनावरही त्यांची चांगली पकड होती. पवारांप्रमाणेच मुंडे यांनाही चांगल्या लोकांची पारख होती.

आपल्या पारखी स्वभावातूनच मुंडे यांनी त्यावेळी ज्युनियर IAS असलेल्या अजोय मेहता व संजयकुमार यांना लागोपाठ आपल्या कार्यालयात सचिव म्हणून नियुक्त केले होते. हे दोन अधिकारी भविष्यात राज्याच्या मुख्य सचिव पदावर जातील असे त्यावेळी कुणालाही वाटले नव्हते अशी माहिती सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना दिली.

Mahavikas Aghadi

गोपीनाथ मुंडे यांना भेटण्यासाठी त्यावेळी अफाट संख्येने लोक यायचे. या लोकांचे समाधान करणे, लोकांची कामे करणे, लोकांचे प्रश्न मार्गी लावणे यांत अजोय मेहता आणि संजयकुमार या दोघांनीही उत्कृष्ट कामगिरी केली होती. किंबहूना लोकहिताची कामे करण्याचे प्रशिक्षणच या दोन्ही अधिकाऱ्यांना गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यकाळात मिळाले. त्याचा मोठा फायदा नंतरच्या काळात या दोन्ही अधिकाऱ्यांना झाला असेही या सूत्रांनी सांगितले.

आणखी एक योगायोग म्हणजे, महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री म्हणून पंकजा मुंडे मागील सरकारमध्ये कार्यरत होत्या. त्या वेळी या खात्याचे प्रधान सचिव संजय कुमार हेच होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी