27 C
Mumbai
Saturday, February 4, 2023
घरमंत्रालयIAS भाग्यश्री बानायत यांची नाशिक अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्ती

IAS भाग्यश्री बानायत यांची नाशिक अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्ती

गेल्या आठवड्यात साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांची विदर्भ वैधानिक विकास महामंडळ नागपूर येथे सदस्य सचिव म्हणून बदली झाली होती. मात्र त्यानंतर आता त्यांची नाशिक विभागाच्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांची विदर्भ वैधानिक विकास महामंडळ नागपूर येथे सदस्य सचिव म्हणून बदली झाली होती. मात्र त्यानंतर आता त्यांची नाशिक विभागाच्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  तसेच औरंगाबाद येथील मानव विकास विभागाचे आयुक्त नितीन पाटील यांची देखील आज बदली झाली आहे. पाटील यांना मुंबईत विशेष विक्रीकर आयुक्त म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

यांनी ६ जून २०२१ रोजी भाग्यश्री बानायत यांनी शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुत्रे हातात घेतली होती. भाग्यश्री बानायत शिर्डी संस्थानाच्या मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून येण्यापूर्वी रेशीम उद्योग विभागाच्या संचालक होत्या. शिर्डी संस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. बानायत यांनी ६ जून २०२१ रोजी श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेऊन पदभार स्वीकारला होता. मात्र काही दिवसांपुर्वी शिर्डी ग्रामस्थांनी त्यांच्या कामकाजावर आक्षेप घेत महसुलमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या होत्या. दरम्यान त्यांची शिर्डी संस्थानातून गेल्या आठवड्यात बदली झाली होती.

हे सुद्धा वाचा
आमीर खानचे पूजा करतानाचे फोटो व्हायरल; सोशल मीडियावर झाला ट्रोल
नरेंद्र मोदींच्या हस्ते रविवारी होणार समृद्धी महामार्गाचे लोकार्पण
कॅटरीना-विकी कौशलची पहिली एनिवर्सरी; विकीने केले खास फोटो शेअर

भाग्यश्री बानायत यांची शिर्डी संस्थानातून बदली झाल्यानंतर त्यांना विदर्भ वैधानिक विकास महामंडळ नागपूर येथे सदस्य सचिव म्हणून नियुक्त केले होते. मात्र आठवडाभरातच त्यांना नागपूर ऐवजी नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्ती देण्यात आली आहे.

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!