31 C
Mumbai
Friday, March 3, 2023
घरमंत्रालयIAS Transfer : आयएएस डॉ. निधी पांडे यांची अमरावती विभागीय आयुक्तपदी बदली

IAS Transfer : आयएएस डॉ. निधी पांडे यांची अमरावती विभागीय आयुक्तपदी बदली

राज्य सरकारने शुक्रवारी (दि.३) रोजी आयएएस अधिकारी ड़ॉ. निधी पांडे यांची महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथून बदली केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. निधी पांडे यांची दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र सदन येथे बदली केली होती. त्यापूर्वी त्यांच्याकडे मुंबईतील व्यवस्थापकीय संचालकपद व शिवशाही पुनर्वसन प्रोजेक्ट खाते होत्याचा कार्यभार होता. (IAS Dr. Nidhi Pandey transferred as Amravati Divisional Commissioner)

आयएएस ड़ॉ. निधी पांडे या नवी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनमध्ये सचिव व आयुक्त (गुंतवणूक आणि राजशिष्टाचार) म्हणून कार्यरत आहेत. त्यांची बदली आता अमरावतीच्या विभागीय आयुक्तपदी करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने तसे आदेश काढले आहेत. आयएएस ड़ॉ. निधी पांडे या सन 2001 सालच्या तुकडीच्या आयएएस अधिकारी आहेत.

हे सुद्धा वाचा

IAS Transfer : मुंबईतील दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

IAS Transfer: राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

IAS Promotion : म्हैसकर दाम्पत्यासह सहा सनदी अधिकाऱ्यांना अतिरिक्त मुख्य सचिवपदी बढती

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी