31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमंत्रालयIAS : अपर मुख्य सचिव भर कौतुक सोहळ्यात अधिकाऱ्यांना म्हणाले, थोडी लाज...

IAS : अपर मुख्य सचिव भर कौतुक सोहळ्यात अधिकाऱ्यांना म्हणाले, थोडी लाज ठेवा; निर्लज्ज होवू नका…

पीडब्ल्यूडी खात्याचे अपर मुख्य सचिव (IAS) मनौज सौनिक यांनी यावेळी अभियंत्यांची चांगलीच शाळा घेतली. आपल्या खात्यावर कामाचा भार आहे. तरीही लोकांच्या हिताची कामे आपण केली पाहिजेत. थोडी लाज ठेवली पाहीजे. निर्लज्ज होऊ नका, असा सल्ला सौनिक यांनी यावेळी अभियंत्यांना दिला.

भारतरत्न मोक्षगुंडम विश्वसरैया यांची आज जयंती आहे. हा दिवस राष्ट्रीय अभियंता दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्त सार्वजनिक बांधकाम खात्यातील (पीडब्ल्यूडी) सर्व अभियंत्यांचा आज कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात झालेल्या या सोहळ्यासाठी राज्यभरातील हजारो अभियंते व इतर कर्मचारी उपस्थित होते. या सोहळ्यामध्ये ६५ अभियंत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. पीडब्ल्यूडी खात्याचे अपर मुख्य सचिव (IAS) मनौज सौनिक यांनी यावेळी अभियंत्यांची चांगलीच शाळा घेतली. आपल्या खात्यावर कामाचा भार आहे. तरीही लोकांच्या हिताची कामे आपण केली पाहिजेत. थोडी लाज ठेवली पाहीजे. निर्लज्ज होऊ नका, असा सल्ला सौनिक यांनी यावेळी अभियंत्यांना दिला.

सौनिक यांनी पीडब्ल्यूडीचे (विद्युत) मुख्य अभियंता संदीप पाटील यांचे तर फक्त कपडेच उतरविणे बाकी ठेवले होते. पाटील यांना साम्राज्य जाईल की काय याची भिती वाटते. काही प्रशासकीय बदल करायला घेतले की पाटील यांना वाटते की, माझ्या विरोधात धोकाधडी चालू आहे, अशा शब्दांत सौनिक यांनी पाटील यांची भरगच्च सभागृहात कानउघाडणी केली.

पीडब्ल्यूडी खात्याची सूत्रे मी चार वर्षांपूर्वी घेतली तेव्हा माझ्या टेबलावर फायलींचे ढिग पडलेले असायचे. या सगळ्या फायली अधिकाऱ्यांच्या विरोधातील शिस्तभंगाच्या कारवाईच्या असायच्या. आपले अधिकारी इतके वाईट काम करतात, मग खात्याचा कारभार चालतो तरी कसा याचे मला त्यावेळी आश्चर्य वाटले होते, अशी आठवण सौनिक यांनी सांगितली.

कोणी काही बोलले तरी आपण कामे करतो. आपण कामे करतो म्हणून सगळीकडे रस्ते दिसतात. भले रस्त्यात खड्डे असतील. आपण किती खड्डे बुजवले हे कोणी सांगत नाही. पण असलेल्या खड्ड्यांचा हिशोब लगेच सांगितला जातो, याकडेही सौनिक यांनी लक्ष वेधले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा अभियंत्यांची शाळा घेतली. पीडब्ल्यूडी म्हटले की नजरेसमोर धूळ, फायली, पैसे आणि डर्टी गेम हे चित्र उभे राहते. महाराष्ट्रातील जनतेची पीडब्ल्यूडीविषयी ही मानसिकता तयार झाल्याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.

हे सुद्धा वाचा

Narendra Modi : ‘नरेंद्र मोदींनी पीडब्ल्यूडी खाते स्वच्छ करण्यासाठी मला पाठवले आहे’

PWD : पीडब्ल्यूडी मंत्र्यांनी अध‍िकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना

पीडब्ल्यूडीचा प्रताप : सरकारी महाविद्यालयात टीचभर काम, हातभर बिल !

संतापजनक : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी RTI कायद्याचा केला पाचापाचोळा

एखादा स्कूटरवाला रस्त्याने जात असताना खड्ड्यात पडतो. तो आपल्या विभागावर टीका करतो. अशा सामान्य लोकांना टीका करण्याची संधी आपण देतो. चुकीच्या मार्गांचा अवलंब करणारे अधिकारी मोठ्या पदांवर जात आहेत. गुणवत्ता असलेले अधिकारी मागे राहत आहेत. हे बदलायला हवे. देशाचे हित पाहायला हवे, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

चांगले बदल करण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला या खात्याचे मंत्री बनविले आहे, असेही चव्हाण म्हणाले.

अधिकाऱ्यांनी मेरीटनुसार खूर्चीत बसले पाहीजे. आमिष दाखवून पुढे येण्यासाठी काहीजण प्रयत्न करीत असतात. मला अशा बाबींची लालसा नाही. विशिष्ट पदे व विभाग मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा लागलेली दिसत आहे. ही स्पर्धा बंद करा, अशा शब्दांत चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले की, अभियंत्यांनी प्रत्येक कामामध्ये सकारात्मकता आणली पाहीजे. नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहीजे. जनतेला उत्कृष्ट सेवा देण्यासाठी प्रयत्नशिल राहिले पाहीजे. आपल्या कामाचा पगार मिळतोच. पण समाधान सुद्धा मिळाले पाहीजे. त्यासाठी सर्वोत्कृष्ट कामाचा संकल्प करा. राज्याला व देशाला प्रगतीसाठी नेण्यासाठी प्रयत्न करा. कामामध्ये पारदर्शकता आणा, अशा सूचना चव्हाण यांनी केल्या.

ते पुढे म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागासमोर अनेक आव्हाने आहेत. आपल्या विभागाकडून जनतेच्याही खूप अपेक्षा आहेत त्या पूर्ण क्षमतेने परिपूर्ण करण्यासाठी काम करा. आपापल्या कामामध्ये सकारात्मकता आणा. कोणताही रस्ता अथवा बांधकाम करताना ते दर्जेदार व उत्कृष्टपणे निर्माण करा.

देश घडविण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. त्यादृष्टीने विभागाने आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल करुन पावले उचलण्याची गरज आहे. विभागाला सध्या निधीची कमतरता आहे. तरीही कमी निधीमध्ये आवश्यक पण दर्जेदार स्वरुपाची कामे करण्याची मानसिकता आपण ठेवली पाहिजे. त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. आपल्या विभागाची प्रतिमा उंचावण्यासाठी आगामी काळात आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून सर्वांच्या सूचनांचे स्वागत करण्यात येईल.

आपली कामे हे पूर्ण क्षमतेने करा. कोणीही आपल्या विभागाविषयी तक्रार करता कामा नये याची प्रत्येकाने दक्षता घ्यायला हवी. मी माझ्या विभागाच्या कामामध्ये उत्कृष्ट सेवा देणार असे जर सर्वांनीच ठरवले तर येणा-या काळात आपला महाराष्ट्र राज्य नक्कीच प्रगतीपथावर जाईल असा विश्वासही मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला.

सन २०१३ ते २०१९ पर्यंत उत्कृष्ट अभियंत्यांच्या पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे

वर्ष २०१३-१४

तत्कालीन कार्यकारी अभियंता साहेबराव सुरवसें, कार्यकारी अभियंता बी.एन. बहिर, तत्कालीन उप अभियंता लक्ष्मीकांत जाधव, उप अभियंता प्रदीप दळवी, सहाय्यक अभियंता श्रीमती रिता शुक्ला, कनिष्ठ अभियंता सुरेश जोशी, कनिष्ठ अभियंता संदीप चाफले, तत्कालीन वास्तुशास्त्रज्ञ मिथिला जाधव, अंजली माटोडकर.

वर्ष २०१४-१५

तत्कालीन अधीक्षक अभियंता खंडेराव पाटील, कार्यकारी अभियंता विजय कारंडे, कार्यकारी अभियंता संजय मुनगिलवार, कार्यकारी अभियंता अनिल लक्ष्मण पवार, उप अभियंता श्रीकांत ढगे, उप अभियंता अनील निमकर, तत्कालीन उप अभियंता अस्मिता खोंडे, कनिष्ठ अभियंता समीर राऊळ, सहा.अभियंता श्रेणी-2 राहुल कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता मोहन महाडीक, तत्कालीन वास्तुशास्त्रज्ञ श्रीमती यशोधरा देशपांडे.

वर्ष २०१५-१६

तत्कालीन अधीक्षक अभियंता राजीव गायकवाड, कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, कार्यकारी अभियंता पोपट वाघमारे, उप अभियंता अजय भोसले, उप अभियंता संदीप कोटलवार, उप अभियंता कृष्णा वाघ, कनिष्ठ अभियंता शिवानंद बिराजदार, कनिष्ठ अभियंता संजय सोमाण, कनिष्ठ अभियंता (विद्युत) इशांत प्रकाश कुलकर्णी, तत्कालीन वास्तुशास्त्रज्ञ संजय गेडाम, वास्तुशास्त्रज्ञ हर्षद साळुंके.

वर्ष २०१६-१७

अधीक्षक अभियंता शामकांत पाटील, तत्कालीन कार्यकारी अभियंता नारायण वेदपाठक, कार्यकारी अभियंता बाबासाहेब थोरात, कार्यकारी अभियंता प्रमोद बनगोसावी, उप अभियंता सच्चिदानंद श्रावणी (अमरावती), उप अभियंता गणेश पाटील (नाशिक),उप अभियंता (विद्युत) संभाजी घोरपडे, कनिष्ठ अभियंता जितेंद्र नेहेते, कनिष्ठ अभियंता आनंद नागरे, सहाय्यक अभियंता श्रीकांत गुलकोटवार, वास्तुशास्त्रज्ञ शिल्पा कडू, सतिश पाटील.

सन २०१७-१८

अधीक्षक अभियंता सुनिल देशमुख, तत्कालीन कार्यकारी अभियंता सुषमा साखरवाडे,तत्कालीन कार्यकारी अभियंता जयंत कुलकर्णी, उप अभियंता ललिता गिरीबुवा, उप अभियंता सत्यशील नगराळे, उप अभियंता सुग्रीव गंगाधर केंद्रे, उप अभियंता संजीवनी करले, कनिष्ठ अभियंता बाबू शिंदे, कनिष्ठ अभियंता सुभाष बल्लाळ.

सन २०१८-१९

अधीक्षक अभियंता विकास रामगुडे, कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, कार्यकारी अभियंता सचिन चिवटे, कार्यकारी अभियंता गजानन टाके, उप अभियंता रश्मी डोळे,कनिष्ठ अभियंता जितेंद्र काळे, कनिष्ठ अभियंता अतुल मुंडे, कनिष्ठ अभियंता (विद्युत) तानाजी थोपटे, पंकज पाटील, योगिता सोडल, दिपाली पवार, आर. बी. राजगुरु.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी