32 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeमंत्रालयIAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरूच !

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरूच !

राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे-भाजप सरकार सत्तेत आल्यापासून आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरुच आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे-भाजप सरकार सत्तेत आल्यापासून आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरुच आहे. दोन आठवड्यांपूर्वी २९ नोव्हेंबर रोजी सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर नऊ डिसेंबर रोजी देखील दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. आज देखील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांची गोंदिया जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तर गोंदियाचे जिल्हाधिकारी नयना अर्जुन गुंडे यांची नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्त म्हणून बदली केली आहे. तसेच नाशिकचे आदिवासी विकास आयुक्त एच. एस. सोनवणे यांची मुंबईत दुग्धविकास आयु्क्त म्हणून बदली केली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने शपथविधीनंतर आय़एएस अधिकारी अश्विनी भिडे आयएएस अधिकारी भाऊसाहेब दांडगे, आयएएस अधिकारी अजीज शेख शेखर सिंह आयएएस अधिकारी श्रीकर परदेशी, आयएएस अधिकारी रमेश पवार, आयएएस अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांची बदली केली होती. नोव्हेंबर महिन्यात आयएएस शीतल उगले-तेली, आयएएस पी. शिवशंकर, आयएएस एस. राममामूर्ती, आयएएस योगेश कुंभेजकर, आयएएस भाग्यश्री विसपुते, आयएएस एस.एम.कुर्तकोटी यांची बदली केली होती. त्या आधी 12 ऑक्टोबरलाही 17 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्या आधी 30 रोजी सरकारने तब्बल 44 आय़एएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यात आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांचा देखील समावेश होता. त्यांची आरोग्य खात्याचे आयुक्त म्हणून बदली केली होती. त्यानंतर 29 नोव्हेंबर रोजी तुकाराम मुंडे यांची आरोग्य खात्यातून बदली करण्यात आली असून ते नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत.

हे सुद्धा वाचा

IAS भाग्यश्री बानायत यांची नाशिक अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्ती

IAS Officer : शिंदे-फडणवीस सरकारने पहिल्यांदाच केल्या ‘आयएएस’ अध‍िकाऱ्यांच्या बदल्या

IAS तुकाराम मुंढे यांची पुन्हा उचलबांगडी

नोव्हेंबर महिन्यात देखील राज्य सरकारने मोठ्याप्रमाणात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर नऊ डिसेंबर रोजी दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. 2 डिसेंबर रोजीच्या शासन आदेशात शिर्डी संस्थानवरुन विदर्भ वैधानिक विकास महामंडळ नागपूर येथे बदली झालेल्या आय़एएस अधिकारी भाग्यश्री बानायत यांची नाशिक विभागाच्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच औरंगाबाद येथील मानव विकास विभागाचे आयुक्त नितीन पाटील यांची देखील आज बदली झाली होती. दरम्यान आज देखील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी