33 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeमंत्रालयमातब्बर आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; तुकाराम मुंढे पशुसंवर्धन सचिव !

मातब्बर आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; तुकाराम मुंढे पशुसंवर्धन सचिव !

राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी पदभार सांभाळताच सचिव पदावरील मात्तबर आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महसूल व वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांची वित्त विभागात उचलबांगडी  करण्यात आली असून नागरी उड्डायन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची मंत्रालयात पशुसंवर्धन विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी पदभार सांभाळताच सचिव पदावरील मातब्बर आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महसूल व वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांची वित्त विभागात उचलबांगडी  करण्यात आली असून नागरी उड्डायन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पशुसंवर्धन खात्याचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महापारेषण विभागाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डी. टी. वाघमारे यांच्याकडे गृह खात्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. आयएएस अधिकारी श्रीमती राधिका रस्तोगी यांची अल्पसंख्यांक विभागात बदली करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांची महापारेषणच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे. श्रावण हर्डीकर यांची मुंबई मनपाच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा :

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवारांचा राजीनामा हा त्यांचा वैयक्तिक आणि राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न

साहेबांना हा निर्णय कधी ना कधी घ्यावाच लागणार होता..! अजित पवारांनी काढली कार्यकर्त्यांची समजूत

तुम्हीच आमचे नेते, तुम्हीच आमची कमिटी…साहेब, राजीनामा मागे घ्या, छगन भुजबळ यांची भावनिक साद !

बदलीच्या कारणावरून नेहमी चर्चेत असणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या खात्याचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर मनपा आयुक्तपदी जी. श्रीकांत यांची नेमणूक करण्यात आली आहे. डॉ. अभिजीत चौधरी यांची छत्रपती संभाजीनगर राज्य कर विभागाच्या सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वस्त्रोद्योग विभागाचे नागपूर येथील संचालक पी. शिवशंकर यांची बदली शिर्डी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी