32 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमंत्रालयIAS तुकाराम मुंढे यांची पुन्हा उचलबांगडी

IAS तुकाराम मुंढे यांची पुन्हा उचलबांगडी

आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांची पुन्हा उचलबांगडी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी कुटुंब कल्याण तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान खात्याच्या आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतला होता.

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा उचलबांगडी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी कुटुंब कल्याण तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान खात्याच्या आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतला होता. त्यानंतर लगेचच त्यांनी राज्यात ठिकठिकाणी दौरे करुन आरोग्य खात्याची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली होती. त्याचच मंगळवारी (दि. 29) रोजी त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांची बदली करण्यात आली असली तरी त्यांना कोणतेही खाते दिलेले नसल्यामुळे त्यांना आता आणखी काहीकाळ खात्याच्या प्रतीक्षेत रहावे लागणार आहे.

आज सहा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत त्यात तुकाराम मुंढे यांच्यासह शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त व्ही. एन. सुर्यवंशी, नांदेडच्या सहायक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा, भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी व्ही. एस. मूग या अधिकाऱ्यांच्या बदल्या तर एस. एम. कुर्ती कोटी यांची नियुक्ती, एस. एस. चव्हाण यांची नियुक्ती या करण्यात आली आहे.

भाग्यश्री बानाईत यांची विदर्भ वैधानिक विकास महामंडळ, नागपूर याठिकाणी बदली करण्यात आली आहे. व्ही एन सूर्यवंशी यांची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तपदी बदली केली आहे. व्ही. एस. मूग यांची परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली केली आहे. सौम्या शर्मा यांची बदली नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर केली आहे. तर एस. एम. कुर्ती कोटी यांची भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच एस. एस. चव्हाण यांची राज्याच्या कृषी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा
धारावीचं घबाड अदानीच्या घशात!

राज्यातलं खोके सरकार कधीतरी महाराष्ट्रासाठी काम करेल का ?, आदित्य ठाकरेंचा घणाघात
‘मंत्रालयातील अधिकारी म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत अवघे अडीच तास बसले’

दरम्यान गेल्या काही महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांची आरोग्य खात्याच्या आयुक्तपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर त्यांनी आरोग्य खात्यात देखील आपल्या धडाकेबाज कामाने सुरूवात केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी मराठवाड्यात दौरा देखील केला होता. यावेळी त्यांनी रुग्णालयांची पाहणी करत, खासगी प्रॅक्टीस करणाऱ्या सरकारी डॉक्टरांना थेट डिसमीस करण्याचा इशारा देखील दिला होता. तसेच सरकारी रुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांच्या तपासण्यांचे रिपोर्ट खासगी लॅबमध्ये न करण्याची तंबी देखील त्यांनी दिली होती. आरोग्य खात्यात काम सुरू करुन काही दिवस होतात न होतात तोच त्यांची उचलबांगडी केल्याने प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी