29.2 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमंत्रालयIAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, महेंद्र कल्याणकरांचे प्रमोशन

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, महेंद्र कल्याणकरांचे प्रमोशन

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा समारोप होतो न होतो तोच ३० डिसेंबर रोजी शिंदे- फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Govt) सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (IAS Transfers) केल्या होत्या. त्यानंतर नव्या वर्षात दुसऱ्याच दिवशी (दि. २ जानेवारी २०२३)  शिंदे – फडणवीस सरकारने तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये आयएएस महेंद्र कल्याणकर (IAS Mahendra Kalyankar), डी.बी. गावडे(IAS D.B.Gawade), आणि धीरज कुमार  (IAS Dheeraj Kumar),यांचा समावेश आहे. सध्या रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असलेले महेंद्र कल्याणकर यांना प्रमोशन देत त्यांची कोकण विभागीय आयुक्तपदी पदोन्नती केली आहे.

महेंद्र कल्याणकर हे सन २००७ च्या बॅचचे आय़एएस अधिकारी आहेत. ऑगस्ट २०२१ मध्ये महेंद्र कल्याणकर यांची राजगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या जागी जिल्हाधिकारीम्हणून बदली झाली होती. कोरोना काळ, अतिवृष्टीच्या काळात जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी राजगड जिल्ह्यात उत्कृष्ट कामगीरी केली होती. सध्या त्यांच्याकडे रायगड जिल्हाधिकारीपदासह कोकण आयुक्तपदाची जबाबदारी देखील होती. आज राज्य सरकारने कल्याणकर यांची कोकण आयुक्तपदी पदोन्नती केली आहे.तर सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसचिव डी.बी. गावडे यांची राज्य मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आयएएस धीरज कुमार यांची कुटुंब कल्याण आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये तुकाराम मुंडे यांची कुटुंब कल्याण तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान खात्याच्या आयुक्तपदावरून बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता धीरज कुमार यांची यापदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर तुकाराम मुंढे अद्याप नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत.

हे सुद्धा वाचा 
IAS Transfers : राजेश पाटील सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक, भाग्यश्री बानायत यांची महिनाभरात तिसरी बदली

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरूच !

IAS तुकाराम मुंढे यांची पुन्हा उचलबांगडी
शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून साधारण पाच महिन्यांचा कालावधील लोटला आहे. याकाळात सरकारने अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे सरकारवर विरोधकांनी वारंवार टीका देखील केली आहे. मात्र या सरकारमध्ये बदल्यांचा सपाटा अद्याप सुरूच आहे गतवर्षाच्या मावळतीला आणि नववर्षाच्या सुरूवातीला देखील सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरूच ठेवल्या आहेत.

नुकतेच ३० डिसेंबर २०२२ रोजी सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या सरकारने केल्या होत्या. त्यात भाग्यश्री बानायत यांची एकाच महिन्यात तिसऱ्यांदा बदली झाल्याने त्यांचे नाव चर्चेत होते. तर नोव्हेंबर महिन्यात आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची देखील कुटुंब कल्याण आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या संचालकपदी बदली झाली होती. त्यानंतर आरोग्य विभागात त्यांनी आपल्या शैलीत काम करण्यास सुरूवात केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच त्यांची बदली करण्यात आली होती. मात्र त्यानंतर अद्याप पर्यंत तुकाराम मुंढे नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी