22 C
Mumbai
Friday, January 27, 2023
घरमंत्रालयIPS विश्वास नांगरे पाटील, सदानंद दाते, मिलींद भारंबे, राज वर्धन यांच्यासह पोलीस...

IPS विश्वास नांगरे पाटील, सदानंद दाते, मिलींद भारंबे, राज वर्धन यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयपीएस विश्वास नांगरे पाटील, सदानंद दाते, मिलिंद भारंबे, राज वर्धन अमिताभ गुप्ता, विनय कुमार चौबे यांच्यासह तीस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश आज राज्याच्या गृह विभागाने काढले अहेत.

आयपीएस विश्वास नांगरे पाटील, सदानंद दाते, मिलिंद भारंबे, राज वर्धन अमिताभ गुप्ता, विनय कुमार चौबे यांच्यासह तीस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश आज राज्याच्या गृह विभागाने काढले अहेत. सहपोलीस आयुक्त ( कायदा सुव्यवस्था, बृहन्मुंबई) विश्वास नांगरे पाटील यांची  अपर पोलीस महासंचालक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग येथे पदोन्नती देण्यात आली आहे. तर मीरा-भाईंदर- वसई-विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनची अपर पोलीस महासंचालक दहशतवाद विरोधी पथक येथे बदली करण्यात आली आहे. विषेश पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मिलींद भारंबे यांची नवी मुंबई पोलीस आयुक्तपदी पदोन्नती देण्यात आली आहे. अपर पोलीस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) विनयकुमार चौबे यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तपदी पद उन्नतीने बदली करण्यात आली आहे.

तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यस्था)पदी बदली करण्यात आली आहे. तर पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले निकेत कौशिक यांना अपर पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई येथे नियुक्ती देण्यात आलेली आहे. तर पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले शिरीष जैन यांना राज्य गुप्त वार्ता विभाग, मुंबई येथे सह आयुक्तपदी नियुक्ती देण्यात आली आहे. कोकण नवी मुंबई परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांची विशेष पोलीस ममहानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था)  पोलीस महासंचालक मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. नागपुरचे अपर पोलीस आयुक्त  नवीनचंद रेड्डी यांची अमरावती पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांची सशस्त्र पोलीस, बृहन्ममुंबई येथे आपर पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांची बृहन्मुंबई वाहतुक विभागाच्या अपर पोलीस आयुक्तपदी बदली केली आहे.

बृहन्मुंबई मध्यप्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर तांबोळी यांची अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, बृहन्मुंबई येथे बदली केली आहे. तसेच विनीत अगरवाल, बिपिन कुमार सिंह, देवेन भारती, प्रभात कुमार आणि महेश पाटील यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत. तर  मुंबई गुन्हे अन्वेशन विभागाचे अपर पोलीस महासंचालक रितेश कुमार यांची पुणे पालीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचे अपर पोलीस महासंचालक मधुकर पांडे यांची मीरा-भाईंदर-वसई-विरारच्या पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

म्हाडा, मुंबईचे अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांची पुणे गुन्हे अन्वेशन विभागाच्या अपर पोलीस महासंचालकपदी बदली केली आहे. महाराष्ट्र सागरी सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सत्यनारायण चौधरी यांची बृहन्मुंबई पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) पदी बदली करण्यात आली आहे. मुंबई दहशतवादी विरोधी पथकाचे विशेष पोलीस महानिरीक्षक निशित मिश्रा यांची बृहन्मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस सह आयुक्तपदी बदली केली आहे. पोलीस महासंचालक (अस्थापना) विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक लखमी गौतम यांची बृहन्मुंबई गुन्हे शाखेच्या पोलीस सह आयुक्तपदी बदली केली आहे. पोलीस महासंचालक (प्रशासन) विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक एस. जयकुमार यांची बृहन्मुंबई (प्रशासन) पोलीस सह आयुक्तपदी बदली केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची नाशिक पोलीस आयुक्तपदी बदली केली आहे. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधीनी, पुणेचे संचालक प्रवीण पवार यांची कोकण परिक्षेत्र (कोकण) चो विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली केली आहे. पुणे मोटार परीवहन विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली केली आहे.

हे सुद्धा वाचा
जलयुक्त शिवार योजनेवर कॅगने ठेवला होता ठपका, चौकशी समितीनेही दाखवल्या होत्या त्रुटी

सरकारविरोधात पुणेकरांची बंदची हाक; पुण्यात शुकशुकाट

हिवाळी अधिवेशन 30 डिसेंबरपर्यंत चालणार; तीन वर्षांनंतर नागपुरात कामकाज!

तर पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले शिरीष जैन यांना राज्य गुप्त वार्ता विभाग, मुंबई येथे सह आयुक्तपदी नियुक्ती देण्यात आली आहे. कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांची विशेष पोलीस ममहानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था)  पोलीस महासंचालक मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. नागपुरचे अपर पोलीस आयुक्त  नवीनचंद रेड्डी यांची अमरावती पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांची सशस्त्र पोलीस, बृहन्ममुंबई येथे आपर पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांची बृहन्मुंबई वाहतुक विभागाच्या अपर पोलीस आयुक्तपदी बदली केली आहे.  बृहन्मुंबई मध्यप्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर तांबोळी यांची अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, बृहन्मुंबई येथे बदली केली आहे. तसेच विनीत अगरवाल, बिपिन कुमार सिंह, देवेन भारती, प्रभात कुमार आणि महेश पाटील यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.

तर  मुंबई गुन्हे अन्वेशन विभागाचे अपर पोलीस महासंचालक रितेश कुमार यांची पुणे पालीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचे अपर पोलीस महासंचालक मधुकर पांडे यांची मीरा-भाईंदर-वसई-विरारच्या पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

म्हाडा, मुंबईचे अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांची पुणे गुन्हे अन्वेशन विभागाच्या अपर पोलीस महासंचालकपदी बदली केली आहे. महाराष्ट्र सागरी सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सत्यनारायण चौधरी यांची बृहन्मुंबई पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) पदी बदली करण्यात आली आहे. मुंबई दहशतवादी विरोधी पथकाचे विशेष पोलीस महानिरीक्षक निशित मिश्रा यांची बृहन्मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस सह आयुक्तपदी बदली केली आहे. पोलीस महासंचालक (अस्थापना) विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक लखमी गौतम यांची बृहन्मुंबई गुन्हे शाखेच्या पोलीस सह आयुक्तपदी बदली केली आहे. पोलीस महासंचालक (प्रशासन) विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक एस. जयकुमार यांची बृहन्मुंबई (प्रशासन) पोलीस सह आयुक्तपदी बदली केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची नाशिक पोलीस आयुक्तपदी बदली केली आहे. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधीनी, पुणेचे संचालक प्रवीण पवार यांची कोकण परिक्षेत्र (कोकण) चो विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली केली आहे. पुणे मोटार परीवहन विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली केली आहे.

तर बृहन्मुंबई संरक्षण व सुरक्षा विभागाचे अपर पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांची बृहन्मुंबई मध्य प्रादेशिक विभागाच्या अपर पोलीस आयुक्तपदी बदली केली आहे. मुंबई दहशतवादी विरोधी पथकाचे पोलीस उपमहानिरीक्षक परमजीत दहिया यांची  बृहन्मुंबई पश्चिम प्रादेशिक विभागाच्या अपर पोलीस आयुक्तपदी बदली केली आहे. बृहन्मुंबई पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख यांची बृहन्मुंबई पूर्व प्रादेशिक विभागाच्या अपर पोलीस आयुक्तपदी बदली केली आहे. बृहन्मुंबई विशेष शाखेचे अपर पोलीस आयुक्त राजीव जैन यांची बृहन्मुंबई उत्तर प्रादेशिक विभागाच्या अपर पोलीस आयुक्तपदी बदली केली आहे. तसेच सुहास वारके, राजकुमार व्हटकर, जयंत नाईकनवरे, बी.जी. शेखर, संजय दराडे आणि विरेंद्र मिश्रा यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या बदलीचे स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येणार आहेत.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!